मुंबई: प्रतिनिधी
संपूर्ण कुटुंबासाठी बघण्याला एक कंटेंट अर्थपूर्ण कथेच्या माध्यमातून सादर सोनी सब ही वाहिनी आता `पश्मिना – धागे मोहब्बत के` या आपल्या नवीन मालिकेच्या रूपात आता एक नवीन, रोमांचक प्रवास सुरू करत आहे. काश्मिरीच्या नयनरम्य पार्श्वभूमीवर बेतलेली ही मालिका दोन पार्श्वभूमीतून आलेल्या व्यक्तींची एक क्लासिक प्रेम कहानी उलगडून दाखवते, जी प्रेक्षकांना नक्कीच भावेल.
`पश्मीना – धागे मोहब्बत के` मालिकेत पश्मिना एक उत्साहाने सळसळणारी मुलगी आहे. आपली प्रेम कहानी तिला स्वतःच घडवायची आहे. ही मालिका प्रेम या विषयाबाबत एक आगळा वेगळा आणि आकर्षक दृष्टिकोन सादर करते आणि काश्मीरच्या अल्हाददायक परिसरात राहणाऱ्या या व्यक्तिरेखांमधील गुंतगुंतीच्या नात्यांचा शोध घेते. सूरी आणि कौल कुटुंबाभोवती फिरणारी ही कहाणी आहे. यात इशा शर्मा पश्मीना सुरीची भूमिका साकारत आहे.गौरी प्रधान प्रीती सुरीची भूमिका तर निशांत मलकानी राघव कौलची भूमिका करत आहे.
काश्मीरमध्ये राहणाऱ्या पश्मिना नामक मुलीची ही गोष्ट आहे. प्रेम उत्साह आणि सकारात्मकता यांनी सळसळणारी ही मुलगी आहे. काश्मीरला येणाऱ्या पर्यटकांना हाऊसबोट भाड्याने देण्याच्या कामी ती आपल्या आईला मदत करत असते. मुंबईच्या राघव नामक एका यशस्वी व्यवसायकांशी गाठ पडल्यानंतर पश्मीनाच्या आयुष्यात एक वेगळे वळण मिळते. प्रेमाविषयी राघवचे मत अगदीच भिन्न आहे, ज्यामुळे त्या दोघांच्यात वैचारिक वादाची सुरुवात होते.
` पश्मीना ` मालिकेत अनेक मोठमोठे कलाकार आहेत. यामध्ये हितेन तेजवानी अविनाश ची भूमिका करत आहे, जो रागावचा गुरु आहे आणि ज्याचा भूतकाळ काश्मीरमध्ये दडलेला आहे पश्मिनाच्या मित्राने पारसची भूमिका साकारली आहे गदहसीचा या कलाकाराने या व्यक्तिरेखा मालिका अधिक आकर्षक करणाऱ्या आहेत मालिका जशी जशी पुढे सरकेल, तसा प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावरील सिनेमॅटिक अनुभव या मालिकेतून मिळेल, जो प्रेक्षकांना खेळवून ठेवेल.
नीरज व्यास बिजनेस हेड, सोनी सब
“सोनी सब ही वाहिनी नेहमी अशा मालिका सादर करण्यासाठी कटिबद्ध असते प्रेक्षकांच्या काळजाला भिडतात आणि त्यांच्यावर चिरकाल टिकणारा प्रभाव सोडतात. पश्मीना मालिका सादर करण्यामागील आमचा उद्देश प्रेक्षकांना एक असा सिनेमॅटिक अनुभव देण्याचा आहे, जो सामान्यपणे मोठ्या पडद्यावरच मिळतो.आपल्या प्रेक्षकांसाठी आगळीवेगळी आणि प्रभावी कथानके सादर करण्याच्या आमच्या निष्ठेची साक्ष पटवणारी ही मालिका आहे.”
सिद्धार्थ मल्होत्रा, निर्माता, आल्केमी फिल्म्स
“या मालिकेच्या रूपाने आम्ही 80 आणि 90 व्या दशकातील क्लासिक रोमान्स परत प्रेक्षकांसमोर आणू इच्छित आहोत, जो पाहताना प्रेक्षक आपल्या भूतकाळातील प्रेम कहानीला उजाळा देऊ शकतील. पश्मीना मालिकेत काश्मीर अगदी अस्सल रूपात, तेथील समृद्ध वैविध्यासकट दाखवले आहे. या मालिकेसह या प्रवासात प्रेक्षक कधी सामील होतात याची मी उत्सुकतेने वाट बघत आहे.”
पश्मीना सुरीची भूमिका करणारी इशा शर्मा
” मी हिमाचल प्रदेशातील असल्याने डोंगर-दऱ्यांविषयी मला पहिल्यापासून खूप प्रेम आणि आकर्षण आहे.आता `पश्मीनाच्या माध्यमातून माझे डोंगराविषयीचे प्रेम आणि माझ्यासाठी लक्षणीय असलेले हे कथानक यांचा संयोग घडवण्याची संधी मला मिळाली आहे.पश्मीना या व्यक्तिरेखेशी माझे खूप साधार्म्य आहे आणि मला वाटते, प्रेक्षकांना देखील ही व्यक्तिरेखा जवळची वाटेल. ती एक उत्साही तरुणी आहे.जिला स्वतःची प्रेम कहानी स्वतःच लिहायची आहे. काश्मिरीची अल्हाददायक पार्श्वभूमी कथेला एक आल्हादक जोड देते. या हृदयस्पर्शी कथानकाच्या प्रवासात प्रेक्षक कधी यांच्यासोबत येतात, याची मी आतुरतेने वाट बघत आहे. ”
राघव ची भूमिका करणार निशांत मलकानी
कोणत्याही कलाकारासाठी काश्मीर हे नेहमी त्यांच्या स्वप्नातले लोकेशन असते. या सुंदर प्रांताचे भव्य आणि दिव्य स्वरूप दाखवण्याची संधी या मालिकेने आम्हाला दिली आहे. क्लासिक रोमान्स दाखवणाऱ्या टेलिव्हिजन मालिकेचा भाग होताना खरोखरच खूपच आनंद होत आहे. काश्मीरचे सौंदर्य खरोखर स्वर्गीय आहे आणि येथे शूटिंग करण्यातला आनंद काही औरच आहे. ही मालिका उभी करण्यासाठी, ती नेत्र- सुखद बनवण्यासाठी आमच्या टीमने खूप मेहनत घेतली आहे.
सोनी सब वरील `पश्मिना – धागे मोहब्बत के’ 25 ऑक्टोबरपासून दर सोमवार ते शनिवार रात्री 7:30 वाजता प्रदर्शित होत आहे.