Home Pimpri-Chinchwad समाजभूषण पुरस्कारांची घोषणा

समाजभूषण पुरस्कारांची घोषणा

समाजभूषण पुरस्कारांची घोषणा

पिंपरी: येथील ‘सृजन प्रतिष्ठान’च्या वतीने स्व.दिगंबरराव कुलकर्णी यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दिल्या जाणाऱ्या समाजदूत या पुरस्कारासाठी यावर्षी पिंपरी चिंचवड साहित्य क्षेत्रातले तीन जेष्ठ साहित्यिक प्राध्यापक तुकाराम पाटील, राजेंद्र घावटे, राज अहेरराव, तसेच जेष्ठ पत्रकार, अविनाश चिलेकर, सुनील लांडगे, डॉ विश्वास मोरे यांची निवड करण्यात आली आहे.


बीड जिल्ह्यातील पाडळळी गावचे जि. प. निवृत्त शिक्षक स्व. दिगंबरराव कुलकर्णी यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पिंपरी चिंचवडस्थित विवेक कुलकर्णी या मुलाने वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सृजन प्रतिष्ठान ही संस्था स्थापन करून त्या संस्थेच्या माध्यमातून समाजातल्या कर्तृत्ववान व्यकींचा यथोचित पुरस्कार करण्याची कल्पना अंमलात आणली आहे.


कर्तृत्ववान व्यकींना गौरवीत करताना त्यांच्या पावलावर पाऊल टाकणारे अनेक समाजदूत/लोकदुत या निमित्ताने तयार होवोत, इतकीच माफक अपेक्षा असल्याची भावना प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी यांनी विशद केली. डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात या पुरस्कार सोहळ्याचे वितरण केले जाईल,स्मृतीचिन्ह, एक ग्रंथ आणि शाल, श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप असेल.