सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे 43 वे वार्षिक स्नेहसंमेलन रावेत येथील आहेर गार्डन येथे मोठ्या उत्साहात पार पडले, कार्यक्रमाची सुरुवात दिप प्रज्वलनाने करण्यात आली. मंडळाचे संस्थापक श्री अरविंद पालव, श्री प्रमोद राणे, त्याचप्रमाणे सल्लागार अंकुशराव साईल, सिंधू लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन,श्री, परशुराम उर्फ भाई प्रभू, मंडळाचे अध्यक्ष श्री अजय पाताडे, उपाध्यक्ष श्री,अरुण दळवी, सेक्रेटरी, एडवोकेट चंद्रकांत गायकवाड, खजिनदार, श्री,धर्मराज सावंत, कार्याध्यक्ष, श्री,विश्वास राणे, सहखजिनदार, श्री,चंद्रकांत साळस्कर, सह सेक्रेटरी,श्री, प्रकाश साईल, नटसिंधूचे अध्यक्ष श्री,राजेश कांडर उपस्थित होते. मंडळातील कलाकारांनी व मुलांनी विविध गुण दर्शनाचे कार्यक्रम सादर केले, या कलाकारांचा सन्मान विधान परिषदेच्या आमदार सौ उमाताई खापरे यांच्या हस्ते करण्यात आला.
या नंतर मंडळातील कलाकारांनी ” शेरास सव्वाशेर” ही एकांकिका सादर केला, पहिलीपासून उच्च शिक्षणापर्यंत व विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार बक्षीस, ट्रॉफी देऊन, पोलीस इन्स्पेक्टर श्री,अविनाश शिंदे साहेब व नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला,
यावेळी श्री सुरेश वेंगुर्लेकर,यावेळी श्री प्रकाश परब, श्री भीवा परब, श्री विष्णू भुते, श्री अशोक मेजरी या मंडळाच्या ज्येष्ठ सभासदांना कार्याची दखल घेऊन जीवन गौरव पुरस्काराने सम्मानित करण्यात आले, त्याबरोबर मंडळाची संलग्न राहून सामाजिक व विविध क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला/संस्थेला सिंधू भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येते, देसाई कुटुंबांचे मंडळामधील योगदान तसेच सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन यावेळी श्री व सौ प्रणिता पांडुरंग देसाई या उभयता या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले,यांचा सन्मान कोकण विकास महासंघाचे अध्यक्ष, डॉक्टर कैलासभाऊ कदम, मा, सत्तारूढ पक्षनेते श्री एकनाथ पवार, नामदेव ढाके, नगरसेवक श्री, शंकरशेठ जगताप, यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले, यावेळी मा,नगरसेवक प्रमोद ताम्हणकर,शिवसेनेचे श्री,हरेश नखाते,सामाजिक कार्यकर्ते,रमेश काळे, हे मान्यवर उपस्थित होते.
श्री नंदकिशोर सावंत,पराग पालकर,आनंद साटलकर, बाळा गुरव, संजय सावंत, वसंत आरेकर, महादेव बागवे,अनिल सावंत,नरेंद्र धुरी, मंगेश साईल स्वप्नील मलबारी, रुपेश काणेकर, यशवंत गावडे, विशाल घाडी, दिपक राणे, संतोष परब,संतोष धुरी, महाडिक,शरद कवठणकर,संतोष परब, सौ दीपज्योती सावंत,अर्चना राऊत, ऐश्वर्या सावंत, मनाली पाताडे,कार्यक्रमाचे मालवणी भाषेमधील सूत्रसंचालन संतोष साटम यांनी केले,श्री अजय पाताडे यांनी अध्यक्ष भाषणामध्ये संबोधित करताना दोन वर्षातनंतर सर्व कोकण वासिय एकत्र आल्याने आनंद व्यक्त केला, त्याचबरोबर कोरोनाच्या मागील दोन वर्षाच्या काळामध्ये जी आपली जवळची माणसं गेली त्यांच्याबद्दल दुःखही व्यक्त केले, कोरोनाच्या काळामध्ये माणसाने माणसाशी कस जगाव हे ही शिकवलं त्यामुळे जीवनामध्ये सर्वांशी हसत खेळत जीवनाचा आनंद घ्या तंदुरुस्त रहा, निरोगी आयुष्य जगा, कधी काही अडचण असेल तर मंडळ आपल्या सोबत आहे अश्या शुभेच्छा व्यक्त करत निधन पावलेल्या व्यक्तीला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला, मंडळाचे सेक्रेटरी एडवोकेट चंद्रकांत गायकवाड यांनी सर्वांनी आभार मानले