पिंपरी, दि.28 – सिंगापूर येथे 1 ते 5 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या एशियन रिदमिक जिम्नास्टिक कोचेस साठीच्या प्रशिक्षणासाठी ज्ञानप्रबोधिनी क्रीडा कुलच्या प्रशिक्षिका अभिश्री रजपूत उर्फ नेहा गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे.
रिदमिक जिम्नास्टिक्स असोसिएशन ऑफ इंडिया यांच्यामार्फत निवड झाली आहे. भारतातून फक्त दोनच कोचेसची यासाठी निवड झाली आहे. ज्यामध्ये अभिश्री राजपूत यांचा समावेश आहे. अभिश्री या क्रीडा कुलच्या पहिल्या बॅचच्या विद्यार्थिनी आहेत. त्यांनी एम.पेड केले आहे. त्याच बरोबर पिंपरी चिंचवडमधील पहिली रिदमिक जिम्नास्टिक राष्ट्रीय पंच होण्याचा मान ही त्या्ंनी मिळवला आहे. तसेच, 2012 च्या ऑलिंपिकसाठी संभाव्य भारतीय संघाच्या रिदमिक जिम्नास्टिक खेळाच्या कॅम्पमध्ये त्याची निवड झालेली होती. राजपूत यांनी अनेक राष्ट्रीय व आंतररष्ट्रीय पदकांची कमाई केली असून त्या सध्या ज्ञानप्रबोधिनी येथे रिदमिक जिम्नास्टिकचे प्रशिक्षण रोज संध्याकाळी आपल्या परिसरातील सर्व मुला मुलींसाठी देत आहेत. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय वाटचालीसाठी ज्ञानप्रबोधिनीचे मुख्याध्यापक मनोज देवळेकर यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.