पुणे: प्रतिनिधी
इंडियन सोसायटी ऑफ हिटिंग, रेफ्रिजरेटिंग अँड एअर कंडिशनिंग इंजिनियर्स (इशरे) तर्फे आयोजित ‘सस्टेनेबल कोल्ड चेन विथ सेफ्टी अँड एनर्जी इफिशियन्सी’ या विषयावरील एक दिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राला चांगला प्रतिसाद मिळाला. कोल्ड चेन क्षेत्रातील आधुनिक तंत्रज्ञान, सरकारी योजना, शाश्वतता, नवसंकल्पना यावर चर्चासत्रात मार्गदर्शन करण्यात आले.
हे चर्चासत्र पीवायसी जिमखाना, डेक्कन जिमखाना येथे १५ सप्टेंबर रोजी पार पडले. ‘ईशरे, पुणे’चे अध्यक्ष नंदकिशोर कोतकर यांनी स्वागत केले. अरविंद सुरंगे, हर्षल सुरंगे यांच्या योगदानाबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.
आबासाहेब काळे, गजानन कल्याणे, ए.के.सिंग, जितेंद्र भांबुरे या मान्यवरांनी या वेळी आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात मार्गदर्शन केले. महेश मोरे, प्रमोद वाजे यांनी सूत्रसंचालन केले. आशुतोष जोशी यांनी आभार मानले. मानस कुलकर्णी आणि संयोजन समिती सदस्यांनी चर्चासत्राच्या आयोजनात योगदान दिले.
चर्चासत्राला १२० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित होते. ब्लू कोल्ड रेफ्रीजरेशन, रेफकॉन इंजिनियरिंग सर्विसेस, पायोनियर इंडस्ट्रीयल इन्स्ट्रूमेंटस्, टेस्टो, रेफकूल सोल्यूशन्स, श्रीरंग ऑटोमेशन यांनी आयोजनात सहकार्य केले.