Home Pimpri-Chinchwad सर्व मातांना शाळेत बोलावून देहूगाव येथील  मापुस्कर गुरुकुल मध्ये  गुरुपौर्णिमा साजरी

सर्व मातांना शाळेत बोलावून देहूगाव येथील  मापुस्कर गुरुकुल मध्ये  गुरुपौर्णिमा साजरी

0
सर्व मातांना शाळेत बोलावून देहूगाव येथील  मापुस्कर गुरुकुल मध्ये  गुरुपौर्णिमा साजरी<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

पहिली गुरू ही आई असते , त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांच्या मातांना शाळेत बोलावून त्यांना वंदन व त्यांची पुजा करून अनोख्या पध्दतीने गुरूपौर्णिमा या शाळेत साजरी करण्यात आली.

पद्मश्री विजेते डॉ. सुहासचंद्र विठ्ठल मापुसकर एज्युकेशन फाउंडेशन संचलित देहूगाव येथील सुनिती विद्यालयं, मापुसकरांचे गुरुकुल  येथील शाळेमध्ये  आज ( सोमवारी) हा कार्यक्रम पार पडला.
अतिशय तेजस्वी व संपन्न असा गुरु शिष्य परंपरेचा वारसा प्राचीन काळापासूनच आपल्या देशाला लाभला आहे. आपली पहिली गुरु आई असते, परंपरेची जोपासना करत समस्त विद्यार्थ्यांच्या मातांना विद्यालयांमध्ये सन्मानपूर्वक निमंत्रित करून सर्व विद्यार्थ्यांच्या शुभहस्ते जलपात्र घेऊन मुलांनी अर्थात विद्यार्थ्यांनी आपापल्या मातांच्या चरणांना स्नान देऊन, चंदनपुष्प अर्पण करून त्यांची पूजा केली व मनोभावे वंदन केलं. आपल्या मुलांनी आपापल्या मातांचं गुरुपौर्णिमेनिमित्त खऱ्या अर्थाने केलेलं हे मातृ वंदन पाहून सर्व माताही भारवल्या.विद्यार्थ्यांना या प्रकारे संस्कारित करत असताना मातृत्व हा नेहमी गौरवाचाच विषय असतो भारतीय संस्कृती व आधुनिकता यांचा संगम साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुनिती विद्यालयं, मापुसकरांचे गुरुकुल मध्ये वेळोवेळी होत राहणार आहे असं सुनिती विद्यालयं, च्या प्राचार्या सोनाली उल्हास मापुस्कर यांनी सांगितलं.
भविष्यात या प्रकारचेच प्राचीन भारतीय संस्कृती, परंपरा व आधुनिकतेचा संगम घडवीत नवनवीन उपक्रम विद्यार्थ्यांना घेऊन करण्यासाठी सुनिती विद्यालयंम्, कटिबद्ध असल्याचेही प्राचार्य सोनाली मापुस्कर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here