Home Health समतोल आहार आणि योग्य उपचार यामुळे स्तनांचा कर्करोग बरा होतो: सरिता सोनावले

समतोल आहार आणि योग्य उपचार यामुळे स्तनांचा कर्करोग बरा होतो: सरिता सोनावले

समतोल आहार आणि योग्य उपचार यामुळे स्तनांचा कर्करोग बरा होतो: सरिता सोनावले

पुणे: प्रतिनिधी

पुण्यातील सामाजिक व विधायक कार्ये करणारी ” सेकंड सॅटरडे कट्टा ही संस्था आहे. ह्या संस्थेच्या वतीने महिलांच्या संबंधीत ब्रेस्ट कॅन्सर (स्तनांचा कर्करोग) या गंभीर विषयाची माहीती व जागृती व्हावी या उद्देशाने पुण्यात एक व्याखानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. व्याख्याता म्हणून सरिता सोनावले तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून डाॅ. अनुराधा कुकडे उपस्थित होत्या.

व्याख्यानात सोनावले म्हणाल्या की, भारतीय स्त्रियांमध्ये ब्रेस्ट कॅन्सरचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. ही फार चिंतेची बाब आहे. काळजी म्हणून स्त्रीनेच याबद्दल सक्षम व्हायला पाहिजे. महिलांनी योग्य पथ्यपाणी व चांगल्या वैद्यकिय संस्थामधून उपचार घेतल्यास हा कॅन्सर बरा होतो. त्यासाठी समाजातील प्रत्येक कुटंबातील प्रत्येक स्त्रीने समतोल व पौष्टिक आहार वेळेवर घ्यावा. नियमितपणे व्यायाम करणे, सकारत्मक व आनंदी राहणे या गोष्टी प्रामुख्याने कराव्यात. यामुळे ब्रेस्ट कॅन्सर आपल्या पासून दूर राहण्यास मदत होईल. तसेच कोणाला हा आजार झाल्यास तो पूर्णपणे बराही होवू शकतो, अशी खात्रीही त्यांनी दिली.

डाॅ अनुराधा कुकडे म्हणाल्या की, स्त्री ही कुटुंबाची पर्यायाने समाजाची शक्ती असते तिच्यावर अनेक जबाबदा-या असतात. त्यामुळे तिने निरोगी व फीट राहणेच गरजेचे आहे. तिने आपल्या आरोग्यासाठीची काळजी घेणे गरजेचे आहे. ब्रेस्ट कॅन्सर विषयी महिलांमध्ये सर्वदूर जागृती होण्यासाठी सरकारने, सामाजिक संस्था संघटनांनी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.

ह्या कार्यक्रमाला महिला वर्ग फार मोठ्या प्रमाणात उपस्थित होता. सुरुवातीला दिपक शिंदे आणि मनोज चन्ना यांचा ‘निसर्गधेन-हास्यधन हा मनोरंजनाचा कार्यक्रम झाला. व्याख्यात्या सरिता सोनावले यांचा सत्कार रेश्माताई पोकळे आणि राजश्रीताई मोहिते ह्यांच्या हस्ते करण्यात आला. डाॅ. अनुराधा कुकडे यांचा सत्कार दुर्गा शुक्रे व सविता आंबेकर यांनी केला. कलाकार दिपक शिंदे यांचा सन्मान आबा जगताप यांनी तर कलाकार मनोज चन्ना यांचा सन्मान शाम पुणेकर यांनी केला.

ह्यावेळी महिलांचा सन्मान म्हणून ‘लकी ड्राॅ’ च्या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना बक्षिसे देण्यात आली. याचे व्यवस्थापन सविताताई आंबेकर व डिंपल ओसवाल यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कट्ट्याचे पदाधिकारी युवराज दिसले, प्रास्ताविक भाषण मिलन पवार, व्यासपीठ व्यवस्था आणि पाहुण्यांचे स्वागत भाग्यश्री बोरकर यांनी तर आभार प्रदर्शन सुनिता बांदल यांनी केले.