
पिंपरी : शहराचे माजी महापौर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांनी अखेर लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी ठाकरे गटात जाण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवारी ते शिवबंधन बांधणार आहेत. ठाकरे गटाकडून वाघेरे यांना मावळमधून उमेदवारी मिळण्यावर शिक्कामोर्तब झाल्याची चर्चा आहे. वाघेरे यांचा पक्षप्रवेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का मानला जात आहे.
सदिच्छा भेटीनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वाघेरे म्हणाले(Pimpri) होते की, ठाकरे यांची भेट घेऊन लोकसभेला इच्छुक असल्याचे सांगितले होते. त्यांनी चर्चा करुन दोन दिवसात सांगतो असे सांगितले होते. अखेरीस वाघेरे यांच्या प्रवेशाला ग्रीन सिग्नल मिळाला.
सदिच्छा भेटीनंतर वाघेरे यांचा प्रवेश निश्चित मानला जात होता. त्यावर शिक्कामोर्तब झाले असून वाघेरे शनिवारी शिवबंधनात अडकणार आहेत.
राष्ट्रवादीतील कोणत्याही नेत्याबाबत नाराजी नाही. उमेदवारीची चर्चा झाली आहे. दोन दिवसात कळवितो असे सांगितले होते. शनिवारी प्रवेशासाठी बोलविले आहे. राजकारणात खूप पाठीमागे राहिलो. पुढे जाण्यासाठी निर्णय घेतला. -संजोग वाघेरे, माजी महापौर