
पिंपरी, दि.28 – “शाळा आहे आमची छोटी परी कीर्ती तिची बहू मोठी रात्रंदिन त्या बाई झटती कार्यक्रमात होण्यासी…जी जी रं जी “. बालवर्गातील लहानशा वरद मावीन कट्टीच्या जोश पूर्ण पोवाडाने श्री साईनाथ शिक्षण संस्थेच्या श्री साईनाथ बालक मंदिराच्या 52 व्या स्नेहसंमेलनाची सुरुवात झाली.चिंचवड येथील रामकृष्ण मोरे सभागृहात रविवारी (दि.24) रोजी हा सोहळा रंगला होता.
या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी रोटरी क्लब ऑफ चिंचवडचे माजी अध्यक्ष महावीर सत्याण्णा, उद्योजिका अश्विनी सत्याण्णा यांनी श्री साईनाथ बालक मंदिरच्या कार्याचे व सादरीकरण केलेल्या सर्व बालचमोंचे कौतुक केले. आपल्या भाषणात ते म्हणाले गेली 52 वर्षे पूर्व प्राथमिक विभागात बालकांचा सर्वांगीण विकास हे ध्येय समोर ठेवून उज्वल पिढी घडवणारी ही शाळा खरोखरच शैक्षणिक क्षेत्रात दीपस्तंभ सारखे काम करते.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर धामणे यांनी संस्थेच्या पुढील योजनांचा उल्लेख करत बालाचमुंना शुभाशीर्वाद दिले. कोषाध्यक्ष डॉक्टर प्रसाद गणपुले यांनी नवीन शैक्षणिक धोरणासाठी बालक मंदिर योग्य ती वाटचाल करत असल्याचे सांगितले. या कार्यक्रमात उपाध्यक्ष प्रा. र.रा. रा बेलसरे, सेक्रेटरी,निशाताई बेलसरे, पालक प्रतिनिधी माविनकट्टी व संपदा देशमुख यांनी मोजक्या शब्दात शाळेच्या यशाचा गौरव आपल्या भाषणातून केला.
पीपीटी च्या माध्यमातून खेळ गटाच्या शिक्षिका मानसिक कुंभार यांनी संपूर्ण शाळा प्रेक्षकांसमोर उलगडून दाखवली. वरद आणि तृथा यांच्या वैयक्तिक नृत्य सादरीकरणाने उपस्थित त्यांची मने जिंकली. बेलसरे बाईंच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेले छोटेसे बाळ बालवर्गातील मुलींनी बहारदारपणे सादर केले. फाईव्ह लिटिल फिंगर्स हे इंग्रजी गाणे आणि दख्खनची राणी या गाण्यांवर प्रेक्षकांनी ठेका धरला. सर्व कार्यक्रमाचा कळस म्हणजे गीत रामायण बालक मंदिरातील 70 विद्यार्थ्यांनी माननीय बेलसरे बाई रचित बालरामायणाचे प्रभावी सादरीकरण केले.
स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला भुसावळ,पाचोरा, धुळे ,वाशिम , सातारा, भोर, लोणी , जालना, रत्नागिरी, मुंबई अशा ठिकाणहून आजी आजोबा व इतर नातेवाईक लहान मुलांच्या विविध कलागुणांना वाव देण्यासाठी व बघण्यासाठी आले होते. यावेळी माजी महापौर अपर्णा डोके, माजी नगरसेवक सुरेश भोईर, राजेंद्र गावडे, देवराम गावडे, माजी नगरसदस्या अश्विनी चिंचवडे, शिक्षिका प्रतिनिधी स्वाती कुलकर्णी आदी उपस्थित होते. प्रज्ञा जोशी आणि योगिता देशपांडे यांनी यांच्यासह सर्व कर्मचारी वर्ग तसेच पालक यांच्या सहकार्याने 52 वे वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न झाले. मुख्याध्यापिका वैभवी तेंडुलकर यांनी सूत्रसंचालनाची धुरा सांभाळली, कार्यकारी मुख्याध्यापिका रेवती नाईक यांनी बालचमूंच्या विविध गुणदर्शनात शब्द रंग भरले. बालक मंदिराला औदार्याने सहकार्य करणार्या व्यक्तींबद्दल प्रज्ञा पाठक यांनी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शितल कुलकर्णी यांनी केले.