पुणे: प्रतिनिधी
अयोध्येतील राममंदिर प्राणप्रतिष्ठापना निमित्त देशभर सर्वत्र दिवाळी प्रमाणे आनंदोत्सव साजरा करण्यात आला. नमो फौंडेशन च्या वतीने सातारा रस्ता पद्मावती जवळ संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महाआरती, दिपोत्सव, प्रसाद व आतिषबाजी यांचा समावेश होता.
या कार्यक्रम प्रसंगी कारसेवक प्रसेनजित फडणवीस, भूषण करमरकर, महेश काळे, सलोनी पांयाळ, ब्रम्हकुमारी अरुणादिदी, व आयोजक हरीश परदेशी, अनिल जाधव यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
आमदार माधुरी मिसाळ, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर आदी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील नागरिक व महिला मोठ्या संखेने उपस्थित होते. या प्रसंगी बोलतांना हरीश परदेशी यांनी अयोध्येत निर्माण करण्यात आलेले रामलल्ला मंदिर हे जगातील सर्वात सुंदर मंदिर असल्याची भावना व्यक्त केली.