Home Pimpri-Chinchwad श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पिंपरीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पिंपरीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

0
श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त पिंपरीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />
शेकडो वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अयोध्येत प्रभू श्रीराम यांच्या मंदिराची स्थापना झाली असून सोमवार दि.22 जानेवारी 2024 रोजी अयोध्येत श्रीरामलल्लांचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा पार पडणार आहे. त्यानिमित्ताने पिंपरीत राष्ट्रीय श्रमिक आघाडीच्या वतीने दिवसभर धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी दिली.
प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित सर्व कार्यक्रम व उपक्रम श्रीगणेश मंदिर, संत तुकारामनगर , पिंपरी येथे पार पडणार आहेत.
यशवंतभाऊ भोसले म्हणाले, दि. 22 जानेवारी रोजी पहाटे 6 वाजता श्रीगणेश अभिषेक व श्री रामलल्ला यांच्या मूर्तीचे पूजन होईल. सकाळी 8 वाजता रामरक्षा पठण सुरू होईल. त्यानंतर सकाळी 9.30 वाजता होम हवन पूजन संपन्न होणार आहे. 11.30 वाजता होम प्रज्वलन सोहळा व मंत्र घोष होईल. दुपारी 12 ते 1 या कालावधीत अयोध्येत पार पडणाऱ्या भव्य श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहोळ्याचे थेट प्रक्षेपण विशाल LED वर करण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून हजारो लोकांना या सोहळ्याचे साक्षीदार होता येणार आहे. त्यानंतर लगेच 1 वाजता महाआरती करण्यात येणार आहे. दुपारी 1.15 वाजता महाप्रसादाला सुरुवात होणार आहे. हजारो भाविकांना याचा लाभ घेता येणार आहे.
दुपारी 3 वाजता भजन व कीर्तनाचा कार्यक्रम सुरू होणार असून सायंकाळी 7 पर्यंत हा कार्यक्रम सुरू राहणार आहे.
सायंकाळी 6.30 वाजता शेकडो दिवे लावून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. त्यानंतर 7 वाजता फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. दिवसभर सुरू असणार्‍या या कार्यक्रमाची सांगता प्रभू श्रीरामाच्या आरतीने सायंकाळी 7.30 वाजता करण्यात येणार आहे.
श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त आयोजित या कार्यक्रमांना शहरातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यामध्ये भारतीय जनता पक्षाचे पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष शंकर जगताप, माजी खासदार अमर साबळे, आमदार महेश लांडगे, उमा खापरे, अश्विनी जगताप, अण्णा बनसोडे, आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, राज्याच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत प्रमुख मिलिंद देशपांडे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाश्चिम महाराष्ट्र प्रमुख संदीप जाधव, सदाशिव खाडे, नंदूअप्पा कदम, माजी महापौर हणमंत भोसले, योगेश बहल, सुजाता पालांडे, सुलक्षणा धर, शाम लांडे, मोहम्मद पानसरे, यांच्यासह राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अमोल घोरपडे, दीपक पाटील, दिनेश पाटील, राजेंद्र अरणकल्ये, राहुल शितोळे, जयदेव अक्कलकोट,मोजम सय्यद आदी उपस्थित राहणार आहेत.
अयोध्येतील श्रीराम प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या निमित्ताने पिंपरी येथे होणार्‍या विविध कार्यक्रमांना परिसरातील नागरिक व कामगार हजारोंच्या संख्येने उपस्थित राहणार असल्याची माहिती, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंतभाऊ भोसले यांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here