Home Pimpri-Chinchwad श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महोत्सव 10  डिसेंबरपासून

श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महोत्सव 10  डिसेंबरपासून

0
श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी महोत्सव 10  डिसेंबरपासून<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

अमर ओक, उत्तरा केळकर, केतकी माटेगावकर, ऋषिकेश रानडे यांचा घडणार संगीत आविष्कार

इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

पिंपरी, 8 डिसेंबर – श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सव 10 ते 14 डिसेंबर 2022 या कालावधीत चिंचवड येथे साजरा होणार आहे. या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि ग्रामस्थांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम, सुगम संगीत, जुगलबंदी तसेच व्याख्यान, आरोग्य व रक्तदान शिबिरांसह विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तर, जीवन गौरव पुरस्कार इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे यांना देण्यात येणार आहे. संजीवन समाधी सोहळ्याचे यंदाचे 461 वे वर्ष आहे.

याबाबतची माहिती ट्रस्टचे मुख्य विश्वस्त मंदार महाराज देव यांनी आज (गुरुवारी) पत्रकार परिषदेत दिली. माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी नगरसेवक मोरेश्वर शेडगे आणि विश्वस्त यावेळी उपस्थित होते. महोत्सवाचे उद्‍‍घाटन पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते 10 डिसेंबरला सायंकाळी 5 वाजता होणार आहे. याप्रसंगी महापालिका आयुक्त शेखर सिंह, तसेच धर्मदाय सहआयुक्त सुधीरकुमार बुक्के, खासदार श्रीरंग बारणे, डॉ.अमोल कोल्हे, आमदार लक्ष्मण जगताप, महेश लांडगे, अण्णा बनसोडे, उमा खापरे, माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, आळंदीतील संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे मुख्य विश्वस्त योगेश देसाई, देहूतील संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे, सासवड येथील संत सोपानदेव समाधी मंदिर संस्थानचे अध्यक्ष अॅड. त्रिगुण गोसावी तसेच चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त जितेंद्र देव, हभप आनंद तांबे, अॅड. राजेंद्र उमाप, विनोद पवार आदी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

महोत्सवानिमित्त 10 ते 14 डिसेंबर या कालावधीत रोज सकाळी 6 वाजता नितीन दैठणकर यांचे श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिर येथे व श्री तुकाराम दैठणकर यांचे श्रीमंगलमूर्ती वाडा येथे सनई-चौघडा वादन होईल. सकाळी 8.30 वाजता श्री मोरया गोसावी चरित्र पठण, सकाळी 9 ते 12 या वेळेत रबडे गुरुजी यांचा सौरयाग होईल. सकाळी 9 ते सायंकाळी 6 या वेळेत रक्तदान शिबिर, नेत्र व दंत चिकित्सा आणि आरोग्य शिबिर होईल.

10 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता संजीवन समाधी महोत्सवाचे उद्घाटन होईल. सायंकाळी 7 ते 8 या वेळेत ह.भ.प पंकज महाराज गावडे यांचे व्याख्यान आणि रात्री 8 ते 10 या वेळेत पं.दासोपंतस्वामी आळंदीकर यांच्या सोबत सिद्धेश उंडाळकर आणि ऋषिकेश उंडाळकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे पखवाज सहवादन होईल. 11 डिसेंबर रोजी सकाळी 9 ते 12 दरम्यान सामुहिक अभिषेक, नेत्र व दंत चिकित्सा शिबिर होईल. दुपारी 12 ते 4 या वेळेत स्थानिक मंडळाचा भजन सेवेचे कार्यक्रम, सायंकाळी 4 ते 6 दरम्यान दशावतारी नाट्य सादर केले जाईल. सायंकाळी 6.30 ते 8 दरम्यान इंद्रनिल बंकापुरे, संस्कार भारती पिंपरी-चिंचवड यांचा मंदिरांच्या देशा हा कार्यक्रम होईल. रात्री 8.30 वाजता अमर ओक, निलेश परब, सत्यजित प्रभू यांचा अमर बन्सी हा संगीत सेवेचा कार्यक्रम होणार आहे.

12 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 4 दरम्यान भजन, सायंकाळी 5 ते 8 बाळकृष्ण महाराज वसंतगडकर यांचे कीर्तन होणार आहे. रात्री 8.30 वाजता उत्तरा केळकर व त्यांचे सहकलाकार यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होणार आहे. 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 ते 6 दरम्यान ज्ञानदा सिद्धेश पंडीत यांचे कीर्तन, सायंकाळी 6 ते 8 दरम्यान  जीवन गौरव पुरस्कार इतिहास संशोधक  पांडुरंग बलकवडे यांना पद्मश्री गिरीश प्रभुणे आणि विश्वस्त मंडळ यांच्या हस्ते  देण्यात येणार आहे. तर, रात्री 8.30 वाजता फिल्मफेअर पुरस्कार विजेती गायिका केतकी माटेगावकर, राष्ट्रीय पुरस्कार विजेता, पार्श्व गायक ऋषिकेश रानडे आणि त्यांचे सहकलाकार यांचा सुगम संगीताचा कार्यक्रम होईल.

14 डिसेंबर रोजी पहाटे 4.30 वाजता संजीवन समाधीची महापूजा होईल. सकाळी 6 वाजता सनई चौघडा वादन, सकाळी 7 वाजता श्री मोरया गोसावी संजीवन समाधी मंदिरावर पुष्पवृष्टी, त्यानंतर चरित्र पठण होईल. त्यानंतर सकाळी 8 ते 9 चिंचवड येथील स्वराज्य ढोलताशा पथकाची मानवंदना होईल. सकाळी 9 ते 10.30 दरम्यान रामायणाचार्य समाधान महाराज शर्मा यांचे काल्याचे कीर्तन होईल. त्यांनतर दुपारी 12 वाजता महाप्रसाद आणि रात्री 10 वाजता श्री मोरया गोसावी संजीवन समाधी समोर आणि श्री मंगलमुर्ती वाडा येथे धुपार्ती होईल. त्यानंतर महोत्सवाची सांगता होईल. या सर्व धार्मिक कार्यक्रमांना गणेश भक्तांनी उपस्थित राहण्याचे आवाहन विश्वस्त मंडळांने केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here