मुंबई: प्रतिनिधी
अत्यंत उत्कंठावर्धक वातावरणात सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन दिव्य ‘श्रीमद् रामायण’ पडद्यावर जिवंत करणार आहे. 1 जानेवारी 2024पासून सुरू होत असलेली ही मालिका दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9:00 वाजता प्रसारित होणार आहे. सदर मालिकेतून हे दिव्य भारतीय महाकाव्य नव्या पद्धतीने समोर येणार आहे. वाहिनीने आता पुढील प्रोमो जारी केला आहे, ज्यामध्ये जन-जन के आदर्श, मन-मन के आराध्य सिया राम यांचे दर्शन घडत आहे.
मालिकेत सीतेची भूमिका प्राची बन्सल करत आहे. तिच्या रूपात सीतेचा शालीन डौल, लवचिकता आणि सीतेचे सामर्थ्य आपल्याला पडद्यावर दिसेल. अभिनेता सुजय रेऊ अढळ श्रद्धा आणि सच्चेपणाचे प्रतीक असलेल्या श्रीरामाची भूमिका करत आहे, जो एक आदर्श पती देखील आहे. जारी करण्यात आलेल्या नवीन प्रोमोमध्ये सीताचा दृढ विश्वास आणि तिच्या मनातील श्री रामाविषयीचे अपार कौतुक दिसते. तिला तो केवळ एक राजकुमार वाटत नाही, तर एक आदर्श जीवनसाथी म्हणून ती त्याच्याकडे पाहते.
हा प्रोमो इथे बघा:
इन्स्टाग्राम:
https://www.instagram.com/reel/C0ls13pr-nV/?igshid=MzRlODBiNWFlZA==
फेसबुक:
https://www.facebook.com/share/v/D9DaovPsP97k6vTJ/?mibextid=WiMSqg
ट्विटर / X:
https://x.com/sonytv/status/1733073273284665508?s=46
सीतेच्या भूमिकेविषयी प्राची बन्सल म्हणते, “मला तर वाटते आहे की, ही भूमिका मी माझ्यासाठीच साकारली आहे. अशी भूमिका फार कमी कलाकारांना त्यांच्या जीवनात करायला मिळते. आपण रामायणाच्या विविध गोष्टी ऐकत लहानाचे मोठे झालो आहोत. त्यामुळे ही सर्वांच्या परिचयाची गोष्ट रोचक पद्धतीने साकारणे हे एक आव्हान आहे. राम आणि सीता ज्या गुणांसाठी ओळखले आणि पूजले जातात, ते गुण म्हणजे, चिरंतन प्रेम, अढळ निष्ठा आणि दृढ विश्वास. हे गुण आम्हाला सौंदर्यदृष्टीने प्रेक्षकांसमोर आणायचे आहेत.”
मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामाची भूमिका करणारा अभिनेता सुजय रेऊ म्हणाला, “या प्रोमोमध्ये सीता आणि रामाच्या नात्यातील प्रगाढ प्रेम आणि एकमेकांविषयीचा आदर व्यक्त होतो, ज्यामुळे या कालातीत कहाणीला एक नवी भावनिक खोली प्राप्त होते.”
‘श्रीमद् रामायण’ सुरू होत आहे 1 जानेवारी 2024 पासून आणि दर सोमवार ते शुक्रवार रात्री 9 वाजता ही मालिका प्रसारित होईल, फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून!