पिंपरी : निगडी प्राधिकरण येथील आदर्शमाता श्रीमती हौसाबाई बाबूराव थोरात (वय ९१) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे, पतवंडे, असा मोठा परिवार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रांत सदस्य विनायक थोरात आणि उद्योजक बापूसाहेब थोरात यांच्या त्या आई तर भाजपाचे पिंपरी-चिंचवड शहर संघटन सरचिटणीस अमोल थोरात आणि उद्योजक आनंद थोरात यांच्या त्या आजी होत.
शेतकरी कुटुंबातील असलेल्या हौसाबाई थोरात यांनी मुलांना सुसंस्कारीत केले. त्यामुळे आदर्श माता म्हणून त्यांची ओळख झाली. त्यांच्या विचारांनुसार आचरण करीत त्यांच्या मुलांनी तसेच आता नातू असलेले अमोल आणि आनंद थोरात यांनी वाटचाल सुरू ठेवली आहे.
श्रीमती हौसाबाई थोरात यांचा दशक्रिया विधी चिंचवडगाव येथील मोरया गोसावी दशक्रिया विधी घाट येथे सोमवार, दि. २४ जानेवारी २०२२ रोजी होणार आहे. यावेळी कोरोना निर्बंध व नियमांचे तंतोतंत पालन करण्यात येणार आहे.