बारामती – शेतकऱ्यांची पगडी, शेतकऱ्यांचा आसुड, मराठी मानाची शाल आणि शेतकऱ्यांच्या महत्वपूर्ण अडीअडचणीच्या मागोव्याचे निवेदन देऊन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा शेतकरी संघटनेचे विठ्ठल पवार राजे यांच्या हस्ते महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने
जाहीर सत्कार करण्यात आला. भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित सहकार परिषदेत शरद जोशी विचार मंच शेतकरी संघटनेच्या वतीने त्यांनी हा सन्मान बारामती येथे कार्यक्रमात स्वीकारला.
बारामती येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या सहकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी तसेच सहकार क्षेत्रातील अनेक मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष विठ्ठल पवार राजे, जेष्ठ पत्रकार व कार्यकारी संपादक संजय जोशी, पुणे जिल्हा सरचिटणीस रवी राणा राजे, प्रगतीशील उद्योजक समीर सरोदे, युवा कार्यकर्ते महेश गिरी उपस्थित होते. राज्यातील ऊस उत्पादक तसेच कापूस, कांदा उत्पादक शेतकरी वर्गाच्या अडचणीबद्दल आणि समस्या दूर करण्याबाबत संघटनेच्या वतीने श्रीमती निर्मला सीतारामन यांना निवेदन देण्यात आले. याबद्दल काळजीपूर्वक विचार केला जाईल असे यावेळी त्यांनी सांगितले.