
ओझर्डे इन्स्टिट्यूट चे विद्यार्थी नयन वीर व रत्नदीप जगदाळे यांची पोलीस सब इन्स्पेक्टर पदी निवड
पिंपरी(नितिन येलमार) : करमाळा तालुक्यातील हिसरे येथील शेतकरी कुटुंबातील नयन वीर याने घरच्या आर्थिक परिस्थितीवर मात करत एएमपीएससी तर्फे पोलिस सब इन्स्पेक्टर परीक्षेत EWS मधून महाराष्ट्रात आठवे येत घवघवीत यश संपादन केलं आहे. मुलाने मिळवलेल्या नेत्रदीपक यशाने नयन याच्या आई वडील यांना आकाश ठेंगणं झालं आहे.
त्याने फक्त परीक्षाच पास केली नाही तर राज्यात ‘पोलिस सब इन्स्पेक्टर म्हणून आठवा क्रमांक पटकवला आहे. नयनचे हे यश अनेकांसाठी प्रेरणादायी आहे. एएमपीएससी मार्फत पोलिस सब इन्स्पेक्टर पदासाठी घेण्यात आलेल्या 2021 च्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला. यात नयनने AWS मधून राज्यात आठवा क्रमांक पटकावला आहे. नयनच्या या यशाबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
करमाळा तालुक्यातील हिसरे हे नयनचं गाव. तालुक्याच्या चिखलठाण येथे नयन शिक्षण घ्यायचा. अकरावी-बारावीचे शिक्षण कर्जत येथून झाले. तर बीकॉम त्याने बारामती मधून केले. घरच्या परिस्थितीमुळे त्याने मामा कडेच राहत प्राथमिक शिक्षण घेतले. घरची परस्थिती प्रतिकूल होती. मात्र परिस्थितीवर मात करत नयननं घवघवीत यश मिळवलं. शासकीय आधिकारी होण्याचं स्वप्न नयननं उराशी बाळगलं होतं. नयनचे वडिल अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यामुळे नयनचे वडिल इतर ठिकाणी काम करायचे. नयनची आई आंगणवाडी मदतनीस म्हणून्न काम करत होती. घरची परिस्थिती हलाखीची होती. मात्र मुलाने शिकावं, असं नयनच्या घरच्यांना वाटायचं. आई-वडिलांनी पाहिलेलं स्वप्न पूर्ण करत नयननं देदीप्यमान यश मिळवलं आहे.
माझ्या आई वडिलांचं मी अधिकारी व्हावं असं स्वप्न होतं. ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी कसलिही अडचण येऊ दिली नाही. त्याचबरोबर अनेक स्पर्धा परीक्षेचा अभ्यास अत्यंत सोप्या पध्दतीने करण्यासाठी निगडी येथील ओझर्डे’ज रॅडिकल इंस्टीट्यूटचे प्रा.भूषण ओझर्डे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचं नयन वीर यानं सांगितलं.
“प्रामाणिकपणे कष्ट केल्यास या जगात अशक्य असे काहीच नाही’ हे नयनला चांगलेच समजले होते. त्यामुळे त्यांने स्पर्धा परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. कारण की, मनात कुठेतरी त्याला खाकी वर्दीबद्दल खास आकर्षण होते. अखेर त्यांची आज पोलिस उपनिरीक्षक या पदी निवड झाली. शिक्षण घेत असताना पाहिलेले स्वप्न व आईवडिलांनी केलेल्या कष्टाचे चीज आज अखेरीस पूर्ण झाले आहे. नयनने कष्टाच्या जोरावर हे यश मिळवले आहे. एका सामान्य कुटुंबातील मुलाने मिळवलेले हे यश व संघर्षमय प्रवास असणाऱ्या नयन याचा आदर्श इतर युवकांनी घेतला पाहिजे, असे नयनचे मार्गदर्शक प्रा.भूषण ओझर्डे यांनी संगितले.