पुणे: प्रतिनिधी
शेतकर्यांसाठी मोबाईलच्या माध्यमातून आपली कृषी उत्पादने अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावीत यासाठी `मार्केटमिरची डॉट कॉम’ अतिशय उपयुक्त ठरले आहे. राजीव गांधी सायन्स अँड टेकनॉलॉजि कमिशन च्या सल्लागार व केंद्र सरकारच्या ग्रामविकास मंत्रालयाच्या `नॅशनल रिसोर्स पर्सन’ असलेल्या ज्येष्ठ संशोधक प्रगती गोखले या उपक्रमासाठी सतत परिश्रम घेत आहेत.त्यांनि मिशन मेरा मोबाइल मेरा मार्केटिंग विथ मार्केटमिरची.कॉम हि चळवळच सुरु केली आहे. ग्रामीण उद्योजक, शेतकरी, कारागीर, बचतगट, शेतकरी उत्पादक संस्था आणि इतर ग्रामीण भागधारकांना प्रभावीपणे `ऑनलाइन’ बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी ही चळवळ खूपच उपयुक्त ठरल्याची माहिती त्यांनी `देशोन्नती’शी बोलताना दिली. ग्रामीण अर्थकारण बदलणार्या त्यांच्या याच उपक्रमाची जागतिक पातळीवर दखल घेतली गेली.
महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिकरण संस्थान या केंद्र शासनाच्या संस्थेत प्रमुख वैज्ञानिक म्हणून कार्यरत असताना त्यांच्या लक्षात आले की, ग्रामीण औद्योगिक क्षेत्राच्या वाढीसाठी मार्केटींगचा मोठा अडसर आहे. ग्रामीण उद्योग कच्चा माल, स्थानिक कृषी उत्पन्न स्रोतांच्या आसपास केंद्रित आहेत आणि बाजारपेठ निकटवर्ती भागात नाही. यामुळे साहजिकच याचा सर्व फायदा दलालां नाच मिळतो. ग्रामीण उद्योजकांना त्यांच्या हातातील मोबाइलचा वापर करून डिजिटल मार्केटिंग साठी सक्षम करण्याचे त्यांनी ठरविले. सुवर्णपदक विजेत्या प्रगती गोखले या सॉफ्टवेअर तज्ञ असल्यामुळे त्यांनी त्यांचे संगणकीय ज्ञान सुगमतेने वापरत मार्केटमिरची.कॉम ची निर्मिती केली. हे ग्रामीण उत्पादने, कृषी उत्पादने, ग्रामीण सेवा आणि ग्रामीण रोजगारांच्या डिजिटल विपणनासाठी सर्व ग्रामीण- कृषी उत्पादनांना अंतर्भूत करणारे स्वदेशी, बहुभाषिक वेब पोर्टल आहे नवीन वेब तंत्रज्ञानामध्ये विकसित केलेले हे पोर्टल ग्रामीण भागासाठी सर्वात योग्य आहे कारण हे डाऊनलोड करावे लागत नाही. पण मोबाइल फ्रेंडली सर्व वैशिष्ट्ये यात आहेत. महत्त्वाचे म्हणजे यात आपली जाहिरात पोस्ट केल्यावर लगेच खरेदीदारांची लिंक पाठविली जाते त्यामुळे ग्रामीण विक्रेते आणि खरेदीदार एकमेकांशी विनामूल्य थेट संपर्क साधू शकतात. एकंदरीत ईकॉमर्स किंवा ट्रेड इंडिया आदी कंपन्यांसारखे व्यवसायिक मॉडेल नाही त्यामुळे सर्व विक्रेते व खरेदीदार ना एकमेका ना विनामूल्य संपर्क करता येतो
मार्केटमिरची.कॉमच्या जोडीने करा विनामूल्य कृषी विपणन
मार्केटमिरची.कॉम वरील पोस्ट फ्री सेल अॅड बटनवर क्लिक करा, श्रेणी निवडा आणि आपण विक्री करू इच्छित असलेल्या उत्पादनाची माहिती द्या. मग आपले नाव, पत्ता, मोबाईल नंबर, पासवर्ड नोंदविण्यासाठी आपल्याला नवीन वापरकर्त्याची नोंदणी बटण दर्शविली जाईल त्या मध्ये आपली माहिती भरा आणि पोस्ट ऍड बटणावर क्लिक करा. आपली ऍड मार्केटमिरची.कॉम वर लगेच दिसू लागेल व ताबडतोब आपल्याला संपर्क करण्यासाठी खरेदीदारां ची लिंक दर्शविली जाईल. त्या लिंकवर क्लिक करा आपल्याला सर्व खरेदीदारां च्या ऍड दिसतील , जेव्हा आपण त्यांच्या वैयक्तिक जाहिरातींवर क्लिक कराल आणि संपर्क, कॉल बटन क्लिक कराल तेव्हा आपल्याला प्रत्येक खरेदीदाराचा फोन नंबर दर्शविला जाईल. आपल्याला पाहिजे असलेल्या सर्व उत्पादनांसाठी खरेदीदार शोधण्यासाठी सर्च बटण देखील आहे. आपण संपर्क साधत असलेल्या खरेदीदारांची संख्या आपल्या जाहिरातीची अॅक्टिव्ह रँक वाढवेल ज्या मुळे अधिक खरेदीदार मिळण्याची शक्यता वाढवणार आहे.
शेतकरी,बचत गट,ग्रामीण उद्योजकांना प्रशिक्षण
मार्केटमिरची.कॉम या व्यासपीठाचा प्रभावीपणे उपयोग करून स्वत:च्या जाहिराती पोस्ट कशा करायच्या तसेच खरेदीदारासोबत संपर्क व व्यवहार कसा करायचा या प्रशिक्षणांसाठी एमकेसीएलने सुंदर हिंदी व्हिडिओ विकसित केले आहेत. प्रगती गोखले यांनी देशभरात ग्रामीण कृषी संस्था मध्ये काम करणार्या सर्व स्तरातील लोकांचे नेटवर्क तयार केले असून त्यांच्या माध्यमातून हे व्हिडिओ शेतकरी, कारागीर , बचत गटाच्या महिला पर्यंत पोचवले जातात. विशेष म्हणजे कोरोनाच्या काळातही विविध वेबिनारच्या माध्यमातून ग्रामीण उद्योजकापर्यंत पोचण्याचे त्यांचे प्रभावी प्रयत्न सुरुच आहेत. देशभरातून सुमारे वीस हजार ग्रामीण उद्योजक, शेतकरी स्वतःचा मोबाइल वापरून स्वतःची जाहिरात मार्केटमिरची डॉट कॉम वर केली किंबहुना स्वतः साठी मार्केट मिळवण्यात यशस्वी झाले.
IIT मुंबई ने पण या उपक्रमा ला आर्टिफिकेल इंटेलिजन्स चे टेकनिकल बळ दिले आहे.
नॅशनल बांबू मिशनच्या विनंतीवरून आता बांबू आणि इतर वनउपजाच्या विपणनाची पण सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. विशेष म्हृणजे बिग बास्केट, रिलायन्स रिटेलनेही मार्केटमिरचीडॉट कॉम थेट शेतकर्यांकडून माल घेण्यासाठी पुढाकार घेतला असल्याची माहिती त्यांनी दिली. त्यांच्या या कार्याचा गौरव डॉ.अनिल काकोडकर, विजय भटकर, विवेक सावंत आदी मान्यवरांनीं केला आहे़
`ग्लोबल वूमन ऑफ वर्थ अवॉर्ड’ने सन्मान
वर्ल्ड वुमेन लीडरशीप काँग्रेसने जगभरातील ५० कर्तुत्त्ववान महिलांचा नुकताच सन्मान केला. यात नागपूरच्या श्रीमती प्रगती गोखले यांना `ग्लोबल वूमन ऑफ वर्थ अवॉर्ड’ ने सन्मानित करण्यात आले. प्रगती गोखले या `मार्केटमिरची.कॉम च्या संस्थापक असून मिशन मेरा मोबाईल मेरा मार्केटिंग च्या मुख्य प्रवर्तक आहेत. देशातील २० हजारांवर शेतकरी,स्वयंसहाय्यता गट, ग्रामीण उद्योजक या तंत्रज्ञानाचा थेट विपणणासाठी वापर करीत आहेत. भारत सरकारच्या एमएसएमई मंत्रालयाच्या प्रधान वैज्ञानिक म्हणून त्या निवृत्त असून आता राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाच्या सल्लागार म्हणून काम करीत आहेत. हा पुरस्कार त्यांना विनामूल्य डिजिटल विपणना द्वारे ग्रामीण डिजिटल सशक्तीकरणाच्या महत्त्वपूर्ण कार्यासाठी देण्यात आला आहे.