Home Maharashtra Special शेकडोंच्या आयुष्यात रंग भरणारे भूषण ओझर्डे

शेकडोंच्या आयुष्यात रंग भरणारे भूषण ओझर्डे

शेकडोंच्या आयुष्यात रंग भरणारे भूषण ओझर्डे<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

Teachers Day(Nitin Yelmar) – शिक्षण क्षेत्रात आपल्या प्रदीर्घ ज्ञानाचे आधारे गुणवत्तापूर्वक शिक्षण देऊन युवा पिढी घढवीणारे व जनमानसाच्या मनातले स्थान प्राप्त असलेले शिक्षणतज्ञ भूषण ओझर्डे यांचा समावेश होतो. त्यांनी 22 वर्षांमध्ये 700 हून अधिक शासकीय अधिकारी घडविले आहेत.

अनेक विद्यार्थ्यांसाठी करियर संबधीतील परिघाचे नानाविध बिंदू समजावून सांगणारे भूषण ओझर्डे जणू भव्य दीपस्तंभच आहेत.

शिक्षण हे परिवर्तनाचे प्रभावी माध्यम मानले गेले आहे. शिक्षणामुळे समाजात शांतियुक्त क्रांती निर्माण होते. आजच्या प्रचलित शिक्षणपद्धतीसह नवीन संकल्पना राबावत विद्यार्थांना भूषण ओझर्डे मार्गदर्शन करत आहेत.

परिवर्तन घडत असताना केवळ विद्यार्थ्यांनी एज्युकेटेड होण्यापुरते मर्यादित न राहता सामाजिक दायित्व म्हणून ‘बीइंग ए ह्युमन’ आवश्यक आहे. अशा ‘लाइफ स्किल’ चे धडे त्यांनी विद्यार्थ्यांना दिले आहेत.

एका अंदाजानुसार देशात आणखी साडेसहा लाख शिक्षकांची गरज आहे. पण हे शिक्षक केवळ पारंपरिक पद्धतीने अभ्यासक्रम शिकवणारे असून चालणार नाहीत. ते अद्ययावत असतील तरच या शिक्षकांच्या बळावर माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात मुलांमध्ये वाढणारे शैक्षणिक नैराश्य आणि उदासीनता दूर करता येईल. नव्या युगातील शैक्षणिक आणि सामाजिक विकासासासाठी आधुनिक शैलीचे अनुकरण करणारे शिक्षक म्हणजे भूषण ओझर्डे!

ज्ञानाची सखोलता, विचारांमधील कल्पकता, वागण्यातील नम्रता, वेळप्रसंंगी असणारी दक्षता, कठीण प्रसंगी आवश्यक असलेली निर्भयता आणि चेहर्‍यावर सतत असलेली प्रसन्नता म्हणजे भूषण ओझर्डे!

उद्याचा देश घडवणारे विद्यार्थी तयार करण्याचे कार्य भूषण ओझर्डे करत आहेत.

भूषण ओझर्डे यांचे ज्ञानयोगाने समृद्ध असणारे जीवन अधिक समृद्ध व्हावे, याच शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here