
पुणे: प्रतिनिधी
दिनांक २९.०१.२०२४ रोजी रा.प. शिवाजीनगर आगारातून अष्टविनायक दर्शन अशी साधी बस सेवा चालू करण्यात आली आहे. सदरची बस शिवाजीनगर आगार वाकडेवाडी येथून सकाळी ७.०० वा. निघून ओझर येथील भक्तीनिवास येथे मुक्काम करणार व दिनांक ३०.०१.२०२४ रोजी रात्री २२.०० पर्यंत शिवाजी नगर येथे परत येईल.
प्रत्येक प्रवाशास रु.९९०-/ एवढे भाडे असून जेवणाचा खर्च व इतर खर्च प्रवाश्यांनी स्वतः करावयाचा आहे. सदर सेवा ही आरक्षण प्रणालीसाठी ATHVNK या सांकेतिक कोड नुसार उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर व इतर संकेतस्थळा वरून देखील आरक्षण करता येईल. सदर सेवा हि अल्प दरात असून प्रवाश्यांनी सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. ज्ञानेश्वर रणवरे आगार व्यवस्थापक (व) रा.प. शिवाजीनगर आगार यांनी केले आहे.