
पुणे: गजानना श्री गणराया, आधी वंदु तुज मोरया, राजाच्या रंगमहाली, रेशमाच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यानी, कर्नाटकी कशीदा मी काढिला, मागे उभा मंगेश, पुढे उभा मंगेश, मी डोलकर, डोलकर दर्याचा राजा, असेन मी नसेन मी ही सदाबहार गीते गीता भुर्के यांनी सादर केली. रसिकाचा त्यस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
जेष्ठ नागरिक संघ, प्रेमनगर यानी कवयित्री शांता शेळके यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित ‘कथा शांताबाई शेळकेंची’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन संघाच्या सभागृहात केले होते. यावेळी प्राचार्य श्याम भुर्के यानी शांताबाईंच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला.आपल्या रसाळ वाणीने त्यानी शांताबाईंचा जीवनपट उलगडून दाखविताना त्यांना प्राचार्य प्र. के. अत्रे, मामा वरेरकर, प्रा. श्री. म.माटे, विद्याधर पुंडलिक यांनी शांताबाईंना दिलेल्या प्रोत्साहनाबद्दल सविस्तर माहीती दिली.
यावेळी भुर्के दांमपत्याचा शाल, श्रीफळ देवून अध्यक्ष विट्ठलराव कुलकर्णी यांनी सत्कार केला. सुभाष बेलसरे यानी आभार प्रदर्शन केले.