Home Business व्हीएम ३ टेक सोल्युशन्स एलएलपीला ‘इंटरनॅशनल बिझनेस स्टार अवॉर्ड

व्हीएम ३ टेक सोल्युशन्स एलएलपीला ‘इंटरनॅशनल बिझनेस स्टार अवॉर्ड

व्हीएम ३ टेक सोल्युशन्स एलएलपीला ‘इंटरनॅशनल बिझनेस स्टार अवॉर्ड

पुणे: प्रतिनिधी

व्हीएम ३ टेक सोल्युशन्स एलएलपीने मागच्या काही वर्षात, डिजिटल मार्केटिंग कंपनी म्हणून आपला एक वेगळा ठसा उमटवला आहे. दि १८ नोव्हेंबर ला दुबई येथे पार पडलेल्या आंतरराष्ट्रीय उद्योग संमेलनामध्ये व्हीएम ३ ला सर्वोत्कृष्ट ब्रॅंडिंग आणि डिजिटल मार्केटिंग कंपनी म्हणून ‘इंटरनॅशनल बिझनेस स्टार अवॉर्ड 2023’ चे पारितोषिक घोषित करण्यात आले.

या संमेलनाचे आयोजन डीके मिशन फोर्स प्रायव्हेट लिमिटेड आणि गल्फ महाराष्ट्र बिझनेस फोरम (GMBF ग्लोबल ) यांनी दुबई इथे केले होते. व्हीएम ३ च्या संस्थापिका वासंती मुळजकर यांना हा सन्मान-पुरस्कार प्रसिद्ध अभिनेता, उद्योजक आणि मार्गदर्शक श्री. सुनील शेट्टी यांच्याकडून प्रदान करण्यात आला.

शेट्टी यांनी यावेळी व्यवसायाबरोबर कौटुंबिक जिव्हाळा कसा जपला पाहिजे याविषयी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच व्यवसायवाढीच्या संधीबाबत मार्गदर्शन केले.

हा पुरस्कार मार्केटिंगच्या जगामध्ये उत्कृष्टता आणि नाविन्यपूर्णतेच्या आमच्या वचनबद्धतेचा पुरावा आहे. आमच्या योगदानाला आज जागतिक स्तरावर ओळख मिळाल्याचा आम्हाला आनंद आहे, असे मनोगत व्हीएम ३ टेक सोल्युशन्स एलएलपीच्या संस्थापिका वासंती मुळजकर यांनी व्यक्त केले.  त्यांनी मार्गदर्शक म्हणून  दिलीप औटी आणि कोमल औटी यांच्या विषयी कृतज्ञता व्यक्त केली आणि कंपनीच्या सर्व सभासदांच्या योगदानाबद्दल आभार मानले.