वेदाभ्यासक पुरोहित साधकांना आळंदीत अन्नदान
आमदार मुरकुटे यांचे हस्ते चव्हाण यांचा सत्कार
आळंदी ( अर्जुन मेदनकर ) : येथील सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक राहुल चव्हाण यांचे वाढदिवसा निमित्त श्रीक्षेत्र शनी शिंगणापूर येथे श्रींची पूजा, अभिषेक, योग प्रात्याक्षिके, विविध तीर्थक्षेत्री दरवर्षी शंभरावर भाविकांना देवदर्शन आणि आळंदीतील वेद व्यास संस्कृत वेदपाठशाळेतील वेदाभ्यासक साधकांना अन्नदान आदी कार्यक्रमांनी वाढदिवस अनावश्यक खर्चाला फाटा देऊन धार्मिक मंगलमय वातावरणात साजरा करण्यात आला. यातून इतरांनी प्रेरणा घ्यावी असा उपक्रम सामाजिक बांधिलकीतून शेकडो नागरिकांसमवेत साजरा करण्यात आला.
डुडुळगाव येथील सामाजिक कार्यकर्ते युवा उद्योजक राहुल चव्हाण यांनी गेल्या अनेक वर्षा पासून आळंदी मंदिरात भाविकांना एकादशी दिनी फराळ वाटप, संत ज्ञानेश्वर महाराज यांनी चाललविलेल्या भिंतीचे प्रांगणात मोफत सार्वजनिक पाणपोई, समाजातील आरोग्य स्थिर रहावे यासाठी गरजू रुग्नासाठी मोफत नेत्र तपासणी,आरोग्य तपासणी शिबिरांचे आयोजन आदी उपक्रम करून सामाजिक बांधिलकी जपत राहुल चव्हाण आळंदी पंचक्रोशीत कार्यरत आहेत. यावर्षीचे वाढदिवस देखील शनिशिंगणापूर, तसेच देवगड संस्थान, नेवासा, रांजणगाव आदी ठिकाणी भाविक, नागरिकांना देवदर्शन घडवीत इतरां पेक्षा आगळा वेगळला उपक्रम राबवित समाजात वाढदिवस साजरा करण्यात आला. विविध क्षेत्रात कार्यरत सेवाभावी संस्थानच्या वतीने त्यांचा सत्कार करीत सामाजिक कार्यास बळ देण्याचे कार्य संस्थाचे सत्कारातून झाले.आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे हस्ते राहुल चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध देवस्थानचे पदाधिकारी आणि सेवाभावी संस्था यांनी देखील चव्हाण यांचा सत्कार करून कार्याचे कौतुक केले.