‘वंचित’चे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना अपेक्षा
अकोला: प्रतिनिधी
सांगली लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे काहीच बोलत नसताना शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा मतदारसंघ काँग्रेसकडून काढून घेतला, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विजय वडेट्टीवार यांनी वंचित बहुजन आघाडीवर केलेल्या आरोपाचा आंबेडकर यांनी सडेतोड समाचार घेतला. वंचित बहुजन आघाडीला अपेक्षा एवढा हुंडा न मिळाल्यामुळे ते आमच्या सोबत आले नाहीत, असे विधान वडे किंवा यांनी केले होते.
महाविकास आघाडीला कालपर्यंत आपले जागावाटप निश्चित करण्यात यश आले नव्हते. अशांनी हुंड्याची भाषा करू नये, अशी टीका करतानाच आंबेडकर यांनी, माझ्या आणि वंचित च्या नादाला लागू नका. आम्ही कपडे फाडण्यात वाकबगार आहोत. आम्ही तोंड उघडले तर तुम्हाला सार्वजनिक ठिकाणी फिरण्याची चोरी होईल, असा इशाराही दिला.
उत्तर आणि दक्षिण भारतीय असुरक्षित
शिवसेनेने प्रथम ‘ लुंगी हटाव पुंगी बजाव,’ अशी घोषणा देत दक्षिण भारत यांच्याविरुद्ध मोर्चा उघडला. त्यानंतर त्यांनी आपला मोर्चा उत्तर भारत यांच्या विरोधात वळवला. त्यावेळी उत्तर भारतीय आणि काही प्रमाणात दक्षिण भारत यांना भाजपा जवळचा वाटत असेल. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उत्तर भारत यांना मारहाण केली. छटपूजेला विरोध केला. आता त्याच मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिल्यामुळे उत्तर भारतीय भाजपपासून दुरावले आहेत. त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना आहे, असा दावा आंबेडकर यांनी केला.