Home Politics विशाल पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बनले सर्वपक्षीय समीकरण

विशाल पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बनले सर्वपक्षीय समीकरण

विशाल पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी बनले सर्वपक्षीय समीकरण<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

सांगली:: प्रतिनिधी

शिवसेना उद्धव ठाकरे गटासाठी स्थानिक नेत्या, कार्यकर्त्यांना न जुमानता काँग्रेसने सोडून दिलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघातील काँग्रेसचे बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांना पाठींबा देण्यासाठी सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील सर्वपक्षीय नगरसेवक एकवटले आहेत. या निमित्ताने राजकारणात नवे समीकरण जुळू पहात आहे.

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघाची जागा शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी देण्यासाठी काँग्रेसला सोडण्याच्या बदल्यात शिवसेना उद्धव ठाकरे गटांने पक्ष संघटनेचे प्रबळ स्थान नसतानाही सांगली लोकसभा मतदारसंघ आपल्या पदरात पाडून घेतला. महाविकास आघाडीतील जागावाटपाच्या चर्चा पूर्णत्वास जाण्यापूर्वीच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना आपल्या पक्षात प्रवेश देत त्यांची सांगलीतून उमेदवारीही जाहीर केली. स्वातंत्र्य मिळाल्यापासून सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला असल्याने स्थानिक नेत्या, कार्यकर्त्यांनी ही जागा काँग्रेसकडेच राहावी यासाठी जिवापाड प्रयत्न केले. विशाल पाटील, विश्वजीत कदम अशा काँग्रेसच्या तगड्या नेत्यांनी पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वापर्यंत धाव घेऊनही त्यांना दाद लागू दिली गेली नाही.

या घडामोडीनंतर या मतदारसंघातील काँग्रेसचे इच्छुक उमेदवार आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी बंडखोरी चा निर्णय घेतला. पक्ष नेतृत्वाने पक्षांतर्गत कारवाईचा बडगा उचलल्यानंतर महाविकास आघाडीच्या व्यापक हिताच्या नावाखाली विश्वजीत कदम यांनी माघार घेतली. मात्र, विशाल पाटील यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर करत बंडाचा झेंडा कायम ठेवला.

या निवडणुकीत विशाल पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी पक्षांतर्गत कारवाईची तमा न बाळगता काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि प्रत्यक्ष भारतीय जनता पक्षाचे सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेतील अनेक नगरसेवक ठामपणे विशाल पाटील यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. ते पाटील यांच्या प्रत्यक्ष प्रचारातही उतरले आहेत. यामुळे पक्षाच्या केंद्रीय किंवा राज्य नेतृत्वाने स्थानिकांच्या भावनांचा विचार न करता घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात स्थानिकांच्या सर्वपक्षीय एकजुटीचे नवे समीकरण सांगलीत बनत आहे. विशाल पाटील यांच्या बंडखोरीमुळे भाजप आणि महायुतीचे उमेदवार संजयकाका पाटील यांना फायदा होत असला तरीही स्वपक्षीय नगरसेवकांचा विशाल पाटील यांना पाठिंबा त्यांची चिंता वाढवणारा ठरणार आहे. विशाल पाटील यांना पाठिंबा देणाऱ्या नगरसेवकांबाबत भाजप, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष काय भूमिका घेतात आणि बंडखोरीवर उतरलेले नगरसेवक त्याला काय प्रतिसाद देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here