
मुंबई: प्रतिनिधी
शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या डॅा.नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत व किरण पाडंव यांच्या समन्वयातून बाळासाहेब भवन, नरीमन पॅाईट, मुंबई येथे ठाकरे गटाच्या भद्रावती, चंद्रपूर नगराध्यक्षा मीनल आत्राम, तसेच त्याचसोबत माजी नगरसेवक नाना दुर्गे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना चंद्रपूर जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष प्रतिमा ठाकूर, मनसे जिल्हा सचिव मनिषा टोकलवार, युवराज जीवतोडे, योगेश ज्ञानेवार, सुनिता जीवतोडे, नयन जंगम, पियूष गुप्ता यांनी डॅा. नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते आज भगवा ध्वज हाती देऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत काम करण्याचा निर्णय घेऊन शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. यावेळी डॅा.नीलम गोऱ्हे म्हणाल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे.
आगामी काळात विजयादशमीनंतर महाराष्ट्रातील शिवसेना महिला सेनेचा आढावा घेतला जाईल. या सर्व कामाला चालना देण्यासाठी सहकार्य राहिल अशी ग्वाही डॉ. गोऱ्हे यांनी पक्षात प्रवेश केलेल्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना दिली. महाराष्ट्रातील महिला शक्ती सर्वोत्तम करून शिवसेना महिला आघाडीमार्फत हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे शिवशाहीचे स्वप्न पूर्ण करणे आमचा हेतू आहे असे डॅा.नीलम गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
यावेळी सह-संपर्कप्रमुख चंद्रपूर बंडू हजारे, जिल्हा प्रमुख नितीन मते, युवासेना जिल्हाप्रमुख सूर्या अडबाले, तालुकाप्रमुख बल्लारपूर जमील शेख, शिवसेना विभागीय कार्यालय प्रमुख नागपूर, प्रफुल्ल मानमोडे, भरत गुप्ता यांच्यासह शिवसैनिक व पदाधिकारी उपस्थित होते.