
नागपूर: प्रतिनिधी
नवीन वर्षाच्या निमित्ताने जनतेच्या आशा, आकांक्षा पूर्ण व्हाव्यात, अशा शुभेच्छा देतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका करणाऱ्या टीकाकारांना टोला लगावला आहे. वाचाळ वीरांना सद्बुद्धी लावावी, अशा शुभेच्छा त्यांनी दिल्या.
सध्याच्या काळात शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शाब्दिक द्वंद्व सुरू आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांना टीकेचे लक्ष्य केले आहे. या पार्श्वभूमीवर नववर्षाच्या शुभेच्छा देताना फडणवीस यांनी टीकाकारांना टोला लगावला.
नवीन वर्षानिमित्त आपला कोणताही व्यक्तिगत संकल्प किंवा आकांक्षा नाही. ज्या जनतेच्या आश्वाकांक्षा त्याच आमच्या अशाकांचा असतात. त्यामुळे या वर्षात जनतेच्या आशा आकांक्षा पूर्ण व्हाव्या, अशी अपेक्षा फडणवीस यांनी व्यक्त केली. नागपूर विमानतळावर पत्रकारांच्या राजकीय प्रश्नांना उत्तर देण्याचे टाळून फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया आटोपती घेतली.