14 मे : तळेगावमध्ये जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या हत्या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. भरदुपारी नगरपरिषदेच्या आवारातच चार ते पाच जणांनी आवारे यांना गोळ्या घातल्या. याशिवाय कोयत्यानेही वार करण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणात नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांच्या मुलाचा हात असून त्यानेच ही हत्या घडून आणल्याचं समोर आलंय. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींकडून ही माहिती मिळाली असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
तळेगाव नगरपरिषदेचे माजी नगरसेवक भानू खळदे यांचा मुलगा गौरव खळदे याने ही हत्या घडवून आणल्याचे तपासात समोर आले आहे. पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींनी या हत्येची कबुली देत महत्त्वाची माहिती दिली आहे. गौरव खदळेनेच आपल्याला ही हत्या करण्यास सांगितल्याचे आरोपींनी सांगितले पोलिसांच्या चौकशीत सांगितले आहे.
तळेगाव पोलिसांनी पोलिसांनी याप्रकरणी गौरव खळदेला देखीस अटक केली आहे. काही महिन्यांपूर्वी जुन्या नगरपरिषद परिसरात भानू खळदे आणि किशोर आवारे यांच्यात खडाजंगी झाली होती. त्यावेळी किशोर आवारे यांनी भानू खळदे यांच्या कानाखाली लगावली होती. याचाच राग मनात धरून भानू खळदे यांचा मुलगा गौरवने अपमानाचा बदला घेण्याचं ठरवलं होतं.
वडिलांच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी गौरवने किशोर आवारे यांची नगरपरिषद कार्यालयातच क्रूर पद्धतीने हत्या घडवून आणली आहे. गौरव खळदेच्या सांगण्यावरून हत्या केल्याची कबुलीही आरोपींनी दिल्याची माहिती पिंपरी चिंचवड पोलिसांनी दिली.
माजी नगरसेवक भानू खळदे यांच्या विरोधात वृक्षतोड केल्याची तक्रार किशोर आवारे यांनी नगरपरिषदेच्या सीईओकडे केली होती. मात्र बांधकाम साईटच्या मार्गालगतची ही वृक्षतोड परवानगीने होती असा दावा भानू खळदे यांनी केला होता. यावरुनच त्यांच्यात वाद झाला आणि आवारे यांनी सर्वांसमोर भानू खळदे यांना कानाखाली लगावली. याच अपमानाचा बदला घेण्यासाठी मुलगा गौरव खळदे नी हत्येचा कट रचला.