![वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने शौर्य दिनानिमित्त अभिवादन बाईक रॅली 2023 चे आयोजन<br />
<b>Deprecated</b>: strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />
वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने शौर्य दिनानिमित्त अभिवादन बाईक रॅली 2023 चे आयोजन<br />
<b>Deprecated</b>: strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />](https://vishwasahyadri.com/wp-content/uploads/2024/01/IMG-20240102-WA0003.jpg)
पुणे: प्रतिनिधी
वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने शौर्य दिनानिमित्त अभिवादन बाईक रॅली 2023 चे आयोजन सुजात आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. वंचित बहुजन युवा आघाडी पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर, पुणे जिल्हा यांनी रॅलीचे संयोजन केले. रॅलीमध्ये वंचित बहुजन आघाडी, वंचित बहुजन माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार जनरल युनियन, वंचित बहुजन महिला आघाडी,फुले आंबेडकर विद्वत सभा, भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल आदी संस्था, संघटनांचे कार्यकर्ते सहभागी झाले.
महात्मा फुले स्मारक या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले, छत्रपती संभाजी महाराज, लोकशाहीर आण्णाभाऊ साठे, आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे तसेच विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्प अर्पण करून रॅलीला सुरुवात करण्यात आली.
रॅलीमध्ये विजय स्तंभाचा रथ बनविण्यात आला. रॅलीमध्ये ५ हजार पेक्षा अधिक दुचाकी व शंभर चार चाकी वाहनातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक सहभागी होते. विविध मंडळांनी रॅलीच्या मार्गावरती आतिषबाजी करून त्याचबरोबर सुजात आंबेडकर यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. लोकांमध्ये रॅली संदर्भात प्रचंड उत्साह होता संपूर्ण रॅली मार्गावर हजारो बाईक स्वर रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी उत्स्फूर्तपणे थांबलेले होते.
भीमा कोरेगाव विजयस्तंभ या ठिकाणी सुजात आंबेडकर यांनी विजयस्तंभ या ठिकाणी रात्री १२ नंतर अभिवादन केले तसेच त्यांनी उपस्थितांना संबोधित केले.
यावेळी भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, वंचित बहुजन युवा आघाडी महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष निलेश विश्वकर्मा, वंचित बहुजन युवा आघाडी प्रदेश महासचिव राजेंद्र पातोडे, राज्य कार्यकारणी सदस्य पुणे जिल्हा निरीक्षक ऋषिकेश नांगरे पाटील, राज्य कार्यकारिणी सदस्य अमित भुईगळ, अमोल लांडगे, एड. अफरोज मुल्ला, विशाल गवळी, कोल्हापूर जिल्हा निरीक्षक महाराष्ट्र देखरेख समिती सदस्य अतुल बहुले हे उपस्थित होते.