
पुणे : लंडन बुक ऑफ रेकॉर्ड तसेच विमान नगर वुमन्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने सिम्बायोसिस कॉलेज इशान्य कल्चरल अॅन्ड एजुकेशनल सेंटर विमाननगर येथे दिनांक १६ फेब्रुवारी रोजी पुण्यातील विविध मान्यवर व्यक्तींचा बुक ऑफ रेकॉर्ड तर्फे मान्यवर व्यक्तींच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे.
पुण्यातील विविध क्षेत्रातील मान्यवर त्यात प्रशासन अधिकारी, पोलीस दलातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते ज्यांनी समाजासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे सत्कार करण्यात येणार आहे.
लंडन बुक ऑफ रेकॉर्ड या जागतिक संस्थे तर्फे प्रथमच पुण्यामध्ये या पुरस्काराचे वितरण होणार आहे. सदर पुरस्कार सोहळ्याला विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती असणार आहे. शासकीय अधिकारी, मंत्री गण, बॉलीवूड तसेच मराठी चित्रपट सृष्टीतील नामवंत कलाकार देखील या पुरस्कार सोहळ्याला उपस्थित असणार आहेत.