Home Politics राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या लढाईला फुटले तोंड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या लढाईला फुटले तोंड

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि चिन्हाच्या लढाईला फुटले तोंड<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

मुंबई: प्रतिनिधी

आपण भाजप आणि शिवसेना महायुती जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस बरोबर कोणताही द्रोह केलेला नाही. देशाच्या आणि जनतेच्या हितासाठीच हा निर्णय घेतला आहे, याचा पुनरुच्चार करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चिन्ह राखायचे आहे आणि पक्ष मोठा करायचा आहे, अशी भूमिका मांडली. मात्र ज्यांना पक्षाबद्दल आत्मीयता टिकवता आली नाही ते पक्ष आणि चिन्ह काय टिकवणार, असा सवाल करत पक्ष आणि चिन्ह कधीही बंडखोरांच्या हाती जाऊ देणार नाही, असा इशारा पक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांनी दिला.

अजित पवार यांनी भाजप शिवसेना महायुतीशी हातमिळवणी केल्यानंतर त्यांनी आणि शरद पवार यांनी आपले आमदार खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन शक्तिप्रदर्शन केले. दोघांनीही आपापल्या भाषणात एकमेकांवर आगपाखड केली.

‘वरिष्ठ नेते निवृत्त कधी होणार?’

मी राजकारणात साहेबांच्या मार्गदर्शनाखालीच घडलो. ते माझ्यासाठी दैवत आहेत. मात्र, शेतकऱ्यापासून उद्योगपती आणि राजकारण्यांपर्यंत सर्व क्षेत्रात कार्यरत असलेले लोक कधी ना कधी निवृत्ती घेतात. आता 83 व्या वर्षी आपणही आराम करा. आम्हाला आशीर्वाद द्या. मार्गदर्शन करा आणि चुकलो तर हक्काने काम धरा, असे सांगत अजित पवार यांनी शरद पवारांना, आता निवृत्त कधी होणार असा सवालच केला.

‘भाजपच्या नादी लागलेल्याचा इतिहास तपासा’

भाजप हा सत्तापिपासू पक्ष आहे. आजपर्यंत देशात भाजपच्या नादाला लागलेल्या पक्षांचे काय झाले याचा इतिहास तपासून पहा, असा सल्ला अजित पवार यांना देतानाच शरद पवार यांनी पंजाब मध्ये अकाली दलाने सर्वस्व गमावले. तीच गत इतर अनेक प्रादेशिक पक्षांची झाली, याची जाणीव आपल्या भाषणात करून दिली. भाजपा बरोबर गेला तर तुमची ही वेगळी गत होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

कथा खंजिरापासून पहाटेच्या शपथविधीपर्यंतचा इतिहासाची

आपल्या भूमिकेच्या समर्थन करताना अजित पवार यांनी शरद पवार यांच्या राजकीय कारकीर्दीतील वसंतदादा पाटील यांच्या पाठीत खूप असलेल्या बहुचर्चित खंजिरापासून ते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या पहाटेच्या शपथविधीपर्यंत अनेक घटनांचा इतिहास आपल्या भाषणात कथन केला. राष्ट्रवादी काँग्रेस सन २०१७ पासूनच भाजपशी हात मिळवण्याचा प्रयत्न अर्थातच ‘वरिष्ठ नेत्यां’च्या पुढाकाराने करीत होता. मात्र त्यावेळी, शिवसेना जातीयवादी पक्ष असल्यामुळे त्यांना दूर ठेवून भाजप आणि राष्ट्रवादी अशी युती करावी, हा वरिष्ठांचा आग्रह भाजपाने मान्य न केल्यामुळे ही युती घडू शकली नाही. पहाटेच्या शपथविधीबाबतही सर्व बाबी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्या वरिष्ठ नेत्यांनीच निश्चित केल्या होत्या. मात्र, आमच्या नेत्यांनी ऐनवेळी आपला निर्णय फिरवला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपची युती होण्यापूर्वीपासून भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये एकत्र येण्यासंबंधी चर्चा सुरू होत्या. त्यावेळीही ऐनवेळी भूमिका बदलल्यानेच भाजप राष्ट्रवादी एकत्र येऊ शकले नाहीत, हा सर्व इतिहास अजित पवार यांनी उपस्थित नेते कार्यकर्त्यांसमोर मांडला.

‘मोदींना पर्याय नाही हे वरिष्ठांनीच आम्हाला वारंवार सांगितले’

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करिष्मा असलेले नेते आहेत. सन २०१४ आणि २०१९ या निवडणुकीत केवळ मोदी या एका व्यक्तीमुळेच भाजपला देशभरात विजय मिळाला. त्यांचे सरकार देशात चांगले काम करीत आहे. विकास घडवून आणत आहे. विदेशातही त्यांच्यामुळे भारताची मान उंचावली आहे. आगामी सन २०२४ च्या निवडणुकीतही मोदी यांच्याशिवाय देशाला पर्याय नाही हे आम्हाला आमच्या वरिष्ठ नेत्यांनीच वारंवार सांगितले आहे, असा दावा ही अजित पवार यांनी केला.

पक्ष आणि चिन्हाबाबत दोन्ही गट निवडणूक आयोगाकडे

राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह आपल्याला मिळावे यासाठी अजित पवार गटाने निवडणूक आयोगाकडे अर्ज दाखल केला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि घड्याळ निवडणूक चिन्हावर कोणी दावा सांगितल्यास आपले म्हणणे हे ऐकून घ्यावे, यासाठी शरद पवार समर्थकांनी आयोगाकडे कॅव्हेट दाखल केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here