पुणे: प्रतिनिधी
शरद पवार यांच्या हस्ते मोदी बाग कार्यालय पुणे येथे बसंतकुमार भाटिया यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ज्येष्ठ नागरिक सेल पुणे शहर अध्यक्ष पदाचे नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
सदर प्रसंगी प्रशांत जगताप शहर अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस व प्रदेश प्रवक्ता, माजी महापौर अंकुश काकडे उपस्थित होते. बसंतकुमार भाटिया यांच्या नियुक्तीचे स्वागत पुणे शहरातील सर्व मान्यवर संस्था व व्यक्तींद्वारा संपूर्ण राजकीय क्षेत्रातून होत आहे व त्यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा त्यांना देण्यात येत आहेत.