नावं ठेवी लोकांला अन, शेंबूड आपल्या नाकाला…
साठच्या दशकात म्हणजे साधारण १९६५ मध्ये प्रसिद्ध सिने दिग्दर्शक बी.आर.चोप्रा यांचा ‘वक्त’ सिनेमा प्रदर्शित झाला होता. त्यात द ग्रेट शेर -ए-शायर अभिनेता राजकुमार यांच्या तोंडी एक डायलॉग होता. तो त्यावेळी इतका पॉप्युलर झाला की, जनतेने केवळ या डायलॉगसाठी अख्खा सिनेमा डोक्यावर घेतला. संपूर्ण देशभरात अलोट गर्दीचे रेकॉर्ड या एका डायलॉगमुळे झाले. साधारण पासष्ट-सत्तरीतील लोकांना अजूनही हा सिनेमा आठवत असेल. तो डायलॉग असा होता… ‘ चिनॉय सेठ, जिनके आपनोंके घर शीशे के हो, वह दूसरों पर पत्थर नहीं फेंका करते ‘ ख्यातनाम संवाद लेखक अख्तर ऊल इमान यांना या डायलॉगमुळे आणखीच प्रसिद्धी मिळाली. हा संवादच राजकुमार यांनी अजरामर करून ठेवला. आजही राजकारणातील भ्रष्ट मंडळींसाठी तो चपखल बसतो. महाराष्ट्रातील सध्याचे राजकीय स्थिती या पेक्षा वेगळी नाही. भ्रष्टाचाराचे असंख्य आरोप अनेक मंत्री, नेते मंडळींवर होत असताना त्याकडे दुर्लक्ष करून सत्ताधारी विरोधकडे बोट दाखविण्यासाठी अगतिक झाले आहेत, हे नकोणत्या नैतिकतेला धरून आहे,असा प्रश्न पडतो.
राज्यात महाआघाडीचे सरकार सत्तेवर आल्यापासून गेल्या दोन-सव्वादोन वर्षांत सामान्य जनतेला हेच तर पहायला मिळाले आहे. जनतेचे प्रश्न भलेही न सुटो; मात्र, आपल्या तुमड्या भरल्या जाव्यात असे एकमेव धोरण दिसते आहे. भ्रष्टाचार, गैरव्यवहार, चारित्र्यहनन अशा विविध कारणांमुळे उद्धव ठाकरे सरकार कमालीचे बॅकफूटवर गेले आहे. अर्ध्या डझनहून अधिक मंत्र्यांची चौकशी सुरु आहे. अभिनेता सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान यांच्या संशयास्पद मृत्यू , उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अन्टेलिया इमारतीबाहेर बॉम्ब पेरण्यापासून ते शंभर कोटीच्या वसुली कांड पर्यंत आणि पत्रकार अर्णव गोस्वामींच्या अटकेपासून ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांच्या नावे कुर्लई (अलिबाग) येथे असलेल्या कथित १९ बंगल्याच्या प्रकरणापर्यंत अशा आरोपांची जंत्रीच जनतेपुढे आहे.
भ्रस्टाचाराची पलटण…
शंभर कोटींच्या खंडणी प्रकरणी राष्ट्रवादीचे जेष्ठ नेता, माजी गृहमंत्री अनिल देशमुख जेलमध्ये आहेत. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची चौकशी सुरु आहे. शिवसेनेचे नेता परिवहन मंत्री अनिल परब हे देखील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या तसेच रत्नागिरीतील वादग्रस्त रिसॉर्ट प्रकरणी चौकशीच्या फेऱ्यांत अडकले आहेत. शिवसेनेचे आणखी एक मंत्री संजय राठोड यांना एका तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात घरी बसावे लागले. राष्ट्रवादीचे समाज कल्याण मंत्री धनंजय मुंडे हे करुणा शर्मा नामक महिलेने केलेल्या आरोपांमुळे चारित्र्य संशयाच्या फेऱ्यात अडकले. शालेय शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी मालमत्तेविषयी निवडणूक आयोगापासून माहिती लपविली म्हणून त्यांना दोन महिन्याचा सश्रम कारावासाची शिक्षा झाली. नेहमी वादग्रस्त वक्तव्ये करणारे राष्ट्रवादीचे प्रवक्ता आणि मंत्री नवाब मलिक, शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक, खासदार भावना गवळी,माजी खासदार आनंदराव अडसूळ, काँग्रेसच्या मंत्री यशोमती ठाकूर आदी सर्व चौकशीच्या फेऱ्यांत अडकले आहेत. आता शिवसेनेचे मुख्य प्रवक्ता स्वयंघोषित ढाण्या संजय राऊत यांच्या कुटुंबीयांची जमीन घोटाळा प्रकरणी ईडी मार्फत चौकशी सुरु आहे, लॉक डाऊनच्या काळात कोरोना उपचारासाठी पुण्यात बोगस कंपनीद्वारे शंभर कोटी मिळविल्याचा आरोप करत भाजपचे किरीट सोमय्या यांनी पुणे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्या पाठोपाठ आता शिवसेनेच्या मुखपत्रासाठी २५ लाख रुपये घेतल्याचे समोर आले आहे. संजय राऊत यांचा तोल सुटल्याने ते आता राजकुमार यांच्या डायलॉग वारंवार म्हणताना दिसतात. पण, त्यांच्या तोंडी हा डायलॉग शोभत नाही. त्यांना नेमका भ्रष्ट ‘चिनॉय सेठ’ कोण हे नक्की माहिती आहे.
चौकशीला कोणी अडविले ?
राज्य सरकारमधील अशी एक ना अनेक भ्रष्ट्राचाराची व अनैतिकतेची प्रकरणे समोर येत असताना पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र, येथील महापालिकेत भ्रष्टाचार झाल्याची स्वप्नं पडू लागली आहेत. हे म्हणजे असे झाले… ‘ नावं ठेवी लोकांला अन शेंबूड आपल्या नाकाला.