पाणी/बेळगाव : कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली आहे. आज प्रचाराचा शेवटचा दिवस असून सर्व पक्षांचा प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे. सीमा भागातील बेळगावमधील निपाणी येथील भाजप उमेदवार शशिकला जोल्ले यांच्या प्रचारार्थ काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली असून राष्ट्रवादी हा केवळ साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे, ते कर्नाटकात काय करणार असा घणाघात केला.
इथे राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आहे. मात्र, हा राष्ट्रवादी महाराष्ट्रात साडेतीन जिल्ह्याचा पक्ष आहे. कर्नाटकात येऊन काय करणार? इथे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मिलीभगत आहे. हे पार्सल महाराष्ट्रात पाठवून द्या, त्याचे काय करायचे बघतो. काँग्रेस आता राहिलेच नाही, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.