Home Pune राष्ट्रध्वजाची विटंबना टाळण्यासाठी ‘भारत फ्लॅग फाउंडेशन’चा पुढाकार

राष्ट्रध्वजाची विटंबना टाळण्यासाठी ‘भारत फ्लॅग फाउंडेशन’चा पुढाकार

राष्ट्रध्वजाची विटंबना टाळण्यासाठी ‘भारत फ्लॅग फाउंडेशन’चा पुढाकार<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

पुणे : प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनानिमित्त घरी, दारी, वाहनांसाठी घेतले जाणारे राष्ट्रध्वज नंतर इतस्ततः पडून त्याचा अवमान होऊ नये म्हणून भारत फ्लॅग फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. नागरिक आणि संस्थांनी इतस्ततः पडलेले ध्वज आढळल्यास ते भारत फ्लॅग फाऊंडेशन, मुरुडकर झेंडेवाले, पासोडया मारूती मंदिरासमोर, बुधवार पेठ येथे जमा करावेत, असे आवाहन  फाऊंडेशनचे संस्थापक गिरिश मुरुडकर, कार्यकारी अध्यक्ष राहुल भालेराव  यांनी केले आहे. या विषयाच्या जनजागृतीसाठी ‘तो कोण होता?’ ही शॉर्ट फिल्म गिरीश मुरुडकर यांनी तयार केली असून ती यू ट्यूबवर पाहण्याचे, प्रसार करण्याचे आवाहन केले आहे.

प्लास्टिक ध्वजाची विक्री बेकायदेशीर

मुरुडकर म्हणाले, 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या दिवशी अनेकजण राष्ट्रध्वज विकत घेऊन मोठ्या अभिमानाने मिरवतात; मात्र हेच कागदी आणि प्लास्टिकचे छोटे-छोटे राष्ट्रध्वज त्याच दिवशी रस्त्यावर, कचऱ्यात  किंवा गटारात पडलेले आढळतात. प्लास्टिकचे ध्वज लवकर नष्टही होत नाहीत, त्यामुळे अनेक दिवस या राष्ट्रध्वजाची विटंबना पहावी लागते, तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री हे कायदाबाह्य ठरते, याची जाणीव मुरुडकर यांनी करून दिली आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाची अशा प्रकारे होणारी विटंबना रोखण्यासाठी भारत फ्लॅग फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. या उपक्रमाचे हे २२ वे वर्ष आहे.जमा साहित्याची शास्त्रशुद्ध, सन्मानपूर्वक पद्धतीने विल्हेवाट लावली जाते. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी माहितीपत्रक व बॉक्सेस हे फाउंडेशनतर्फे विनामूल्य  पुरवले जातील. त्यासाठी गिरीश मुरूडकर -9822013292, राहुल भालेराव -9822596011 यांच्याशी  संपर्क साधता येईल. ज्या तिरंग्यासाठी हजारोनी बलिदान केले, तो तिरंगा पायदळी जाऊ नये याची काळजी घ्यावी, ध्वजविषयक आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, असे आवाहनही फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे .

लघुपटाद्वारे जनजागृती

हा विषय बाल-तरुणांपर्यंत पोहचवण्यासाठी यंदा गिरीश मुरुडकर यांनी  “तो कोण होता?” हा सुंदर लघुपट बनवला असून (यु ट्यूब वर उपलब्ध आहे)- तो सर्व तरुणांपर्यंत पोहोचावी यासाठी प्रत्येकाने ती  फॉरवर्ड करावी, असे आवाहन फाउंडेशन तर्फे करण्यात येत आहे.

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here