Home National International ‘राम मंदिराचे उद्घाटन हे मुस्लिमांविरोधातील ऑपरेशन ब्लू स्टार’

‘राम मंदिराचे उद्घाटन हे मुस्लिमांविरोधातील ऑपरेशन ब्लू स्टार’

‘राम मंदिराचे उद्घाटन हे मुस्लिमांविरोधातील ऑपरेशन ब्लू स्टार’

खलिस्तानवादी अतिरेकी गुरूपतवंत सिंग पन्नू याचे मुस्लिमांना चिथवण्याचे प्रयत्न

टोरँटो: वृत्तसंस्था

खलिस्तानवादी अतिरेकी गुरुपतवंत सिंग पन्नू याने अयोध्येतील राम मंदिराची उभारणी आणि उद्घाटन हे भारत सरकारने मुस्लिमांच्या विरोधात उघडलेले ऑपरेशन ब्लू स्टार असल्याचे सांगत मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे. मुस्लिमांनी भारतातून स्वतंत्र उर्दूस्थान निर्माण करावे, अशी गरळही त्याने ओकली आहे.

परदेशात राहून भारताविरुद्ध कारस्थाने करणाऱ्या सिख फॉर जस्टिस या दहशतवादी संघटनेचा प्रमुख असलेला पन्नू याने एक व्हिडिओ प्रसिद्ध करून राम मंदिर आणि मोदी सरकारच्या विरोधात मुस्लिमांना भडकवण्याचा प्रयत्न केला आहे.

राम मंदिर उद्घाटन कार्यक्रमाला मुस्लिमांनी विरोध करावा. त्यांनी उद्घाटनाच्या २२ जानेवारी या दिवसापूर्वी अमृतसरपासून अयोध्येपर्यंत सर्व विमानतळे बंद करावी, असे आवाहन पन्नू यांने केले आहे. बाबरी मशीद उध्वस्त करून अयोध्येत राम मंदिर उभारले असल्याचा आरोपही त्याने केला आहे.

पन्नू हा आपल्या संघटनेमार्फत खलिस्तानवादी विचारांचा प्रचार प्रसार करणे, दहशतवादी कारवायांसाठी निधी जमा करणे, तरुणांची माथी भडकावून त्यांना दहशतवादी संघटनेकडे आकृष्ट करणे अशा कारवाया भारताला बाहेर राहून करत असतो. त्याच्याकडे अमेरिका आणि कॅनडा अशा दोन देशांचे नागरिकत्व आहे.