मुंबई: प्रतिनिधी
आमदार अपात्रतेबाबत निर्णय घेण्यास विलंब होत असल्याबद्दल विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. आमदार अपात्रतेबाबत अध्यक्षांकडून सोमवारपासून सुनावणी सुरू करण्यात येईल अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 16 आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घेण्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून विलंब केला जात असून त्वरित निर्णय घेण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्देश द्यावे, अशी मागणी करणारी ही याचिका शिवसेना ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आली आहे. या या पिके वर झालेल्या सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्षांना फटकारले. एक आठवड्याच्या आत याबाबत सुनावणी सुरू करण्याच्या सूचनाही न्यायालयाने अध्यक्षांना दिल्या.
या न्यायालयीन घडामोडीनंतर अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी राजधानी दिल्ली येथे जाऊन कायदे तज्ज्ञांशी चर्चा केली. त्यानंतर सोमवारपासून आमदार अपात्रतेबाबत सुनावणी घेण्याचा निर्णय झा सूत्रांनी सांगितले. आमदार अपात्रतेबाबत निर्णय घेण्यास विलंब केला जाणार नाही त्याचप्रमाणे ही निर्णय घेतला जाणार नाही, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपाचा प्लॅन बी तयार
दरम्यान, आमदार पात्रतेच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर राज्यात राजकीय घडामोडींना ही वेग आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह सोहळा आमदारांना अपात्र ठरविले गेल्यास अजित पवार यांना मुख्यमंत्रीपदावर बसविण्याचा भारतीय जनता पक्षाचा ‘प्लॅन बी’ असल्याचे सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नितीन गडकरी आणि राधाकृष्ण विखे पाटील यांची नावे ही मुख्यमंत्री पदासाठी चर्चेत आहेत.