Home Breaking News राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; विनयकुमार चौबे पिंपरी-चिंचवड़ चे नवीन पोलीस आयुक्त

राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; विनयकुमार चौबे पिंपरी-चिंचवड़ चे नवीन पोलीस आयुक्त

0
राज्यात पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या; विनयकुमार चौबे पिंपरी-चिंचवड़ चे नवीन पोलीस आयुक्त<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

मुंबई – राज्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र पोलीस अधिनियम (१९५१ चा २२) कलम २२ यामधील तरतुदींनुसार हे बदल करण्यात आले असून बदलीने, पदोन्नतीने आणि पद उन्नत करून हे खांदेपालट करण्यात आले आहेत.

मीरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्त सदानंद दाते यांना दहशतवाद विरोधी पथकाचा पदभार देण्यात आला आहे. तर, मुंबईचे सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना लाचलुचपत प्रतिबंध विभागात बढती मिळाली आहे.

मिलिंद भारांबे यांना नवी मुंबईचे पोलीस आयुक्तपद देण्यात आले आहे. तर, मुंबई वाहतूक विभागाचे सह पोलीस आयुक्त राज वर्धन यांना महाराष्ट्र राज्य सुरक्षा मंडळात अपर पोलीस महासंचालक पद देण्यात आले आहे. विनय कुमार चौबे यांना पद उन्नत करून पिंपरी चिंचवड येथील पोलीस आयुक्तपद देण्यात आले आहे. पुणे शहराचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना कायदा आणि सुव्यवस्था विभागात अपर पोलीस महासंचालक पद देण्यात आले असून निकेत कौशिक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागात अपर पोलीस महासंचालकपदी नियुक्त करण्यात आले आहे.

शिरीष जैन राज्य गुप्तवार्ता विभागाचे सहआयुक्त असतील तर, संजय मोहिते कायदा आणि सुव्यवस्था विभागात विशेष पोलीस महानिरिक्षकपदी नियुक्त करण्यात आले आहेत.

नवीनचंद्र रेड्डी अमरावती शहर पोलीस आयुक्त, आरती सिंह मुंबईतील सशस्त्र अपर पोलीस आयुक्त, नामदेव चव्हाण गुन्हे अन्वेषण विभागात पोलीस उपमहानिरिक्षक, निसार तांबोळी मुंबई वाहतूक अपर पोलीस आयुक्त, ज्ञानेश्वर चव्हाण मुंबई गुन्हे अपर पोलीस आयुक्त आणि रंजन कुमार शर्मा मुंबई विशेष शाखा अपर पोलीस आयुक्तपदी नियुक्त करण्यात आले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here