राज्यात आजपासून शाळा (Schools ) सुरू होत आहेत.विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षांला (New Academic Year ) सुरूवात होणार आहे. यावर्षी विद्यार्थी (students) आणि शाळांसाठी महत्त्वाचे बदल राज्याच्या शिक्षण विभागाने केल्याने यावर्षीच्या शैक्षणिक वर्षांबद्दल विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे. तर या पार्श्वभूमीवर राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर (Dipak Kesarkar) यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षांसाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. ( Maharashtra Schools starts from today students curious about new educational changes )
यावर्षीपासून राज्यात नवं शैक्षणिक धोरण, एक राज्य, एक गणवेश त्याचबरोबर पाठ्यापुस्तकांतील बदल हे महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यामुळे आता शाळा आणि विद्यार्थ्यांना या बदलांना सामोरे जाताना कोण-कोणते आव्हाणं निर्माण होतात. त्यावर काय पर्याय निघतात हे पाहण महत्त्वाचं ठरणार आहे.
काय आहेत शिक्षण विभागाने केलेले बदल?
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय वर्ष २०२३- २४ साठी एकात्मिक बालभारतीची चार भागांमध्ये पाठ्यपुस्तके उपलब्ध करून दिली आहेत. ही पुस्तके यावर्षी मराठी, इंग्रजी, हिंदी व उर्दू या चार माध्यमांसाठी पथदर्शी प्रकल्पांतर्गत लागू करण्यात आली आहेत. या पाठ्यपुस्तकांमध्ये विषयनिहाय पाठ, धडे व कविता इत्यादींच्या आवश्यकतेनुसार वहीची पृष्ठे समाविष्ट केलेली आहेत.
पाठ्यपुस्तकातील पृष्ठांचा वापर विद्यार्थ्यांनी कशाप्रकारे करावा या संदर्भातील उद्बोधन सत्र मंडळाने https://www.youtube.com/c/eBalbharati-msbt या लिंकवर १४ जून रोजी सकाळी ११ वाजल्यापासून उपलब्ध करून दिले आहे.