महाविकास आघाडी मधील काही राजकीय नेत्यांची फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेल्या रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी (Maharashtra DGP) नियुक्ती करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला 1988 च्या बॅचच्या आयपीएस असून यांची कारकीर्द मोठ्या वादात सापडली होती.
रश्मी शुक्ला यांच्यावरती पुणे आणि मुंबई या दोन ठिकाणी वेगवेगळे दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते. नाना पटोले, संजय काकडे, संजय राऊत यांच्यासह महाविकास आघाडी मधील अनेक नेत्यांची फोन टॅपिंग प्रकरणाची त्यांच्यावर आरोप होते. पुढे दोन्ही गुन्हे कोर्टाने रद्द केले.
कोण आहेत रश्मी शुक्ला?
(Who Is Rashmi Shukla) रश्मी शुक्ला या 1988 च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या आयपीएस अधिकारी आहेत. त्यांनी केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) अतिरिक्त महासंचालक म्हणूनही काम केले आहे. रश्मी शुक्ला यांनी पुण्याचे पोलीस आयुक्त आणि राज्य गुप्तचर शाखेचे संचालक म्हणून काम केले आहे.
एक प्रकारे ही रक्षाबंधनाची भेट आहे?
रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती झाल्यानंतर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियाही समोर येत आहेत. यातच शरद पवार गटाचे आमदार आणि नेते एकनाथ खडसे म्हणाले आहेत की, ”रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांना राखी बांधली होती.
ते म्हणाले आहेत की, ”महाराष्ट्रात एकनाथ शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांच सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांची बढती होईल, हे माहित होते. त्यांनी माझा फोन टॅप केला होता.
मला न विचारता, आपल्या सरकारमध्ये आपले ऐकणारे अधिकारीही हवे आहेत. आता पोस्टींग मिळाली, पूर्वी अनधिकृत पण आता अधिकृतपणे फोन टॅप होतील. विरोधकांनी अधिक सावध राहण्याची गरज आहे.