Home Pimpri-Chinchwad राजेश पवार यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांच्या हस्ते

राजेश पवार यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांच्या हस्ते

0
राजेश पवार यांच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन पद्मश्री गिरीशजी प्रभुणे यांच्या हस्ते

उन्नती फाउंडेशन आयोजित राजेश पवार यांच्या कलात्मक छायाचित्र प्रदर्शनाचे आज सकाळी पद्मश्री श्री गिरीश प्रभुणे यांच्या हस्ते उद्घाटन झाले.

या प्रदर्शनात श्री पवार यांची निवडक 75 कलात्मक छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत. यावेळी उन्नती फाउंडेशनचे श्री संजय भिसे सौ कुंदाताई भिसे व इतर मान्यवर उपस्थित होते. हे प्रदर्शन पिंपळे सौदागर येथील पी के स्कूलच्या समोर उन्नती फाउंडेशन च्या आवारात दिनांक 18 ते 25 सप्टेंबर यादरम्यान सकाळी दहा ते रात्री दहा या वेळेत खुले राहणार आहे.