
अमरावती: प्रतिनिधी
अमरावती लोकसभा मतदारसंघात निवडणूक प्रचारादरम्यान वैयक्तिक आरोग्य प्रत्यारोप आणि टीकाटिप्पणीने टोक गाठले आहे. रवी राणा यांची बेताल वक्तव्य हेच नवनीत राणा यांच्या पराभवाचे प्रमुख कारण ठरेल, अशी टीका ‘प्रहार’चे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनी केली आहे.
भारतीय जनता पक्षाने नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याबद्दल संतप्त होऊन बच्चू कडू यांनी महायुतीची साथ संगत सोडून राणा यांच्या विरोधात दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. आपले प्रतिस्पर्धी उमेदवार दिनेश बूब हे दिवसातील सर्वाधिक काळ दारू आणि जुगार यातच मग्न असतात, अशी टीका रवी राणा यांनी केली आहे
रवी राणा हे ताळतंत्र सोडून विरोधी उमेदवारांवर बेछूट आरोप करत आहेत. त्यांच्या या वक्तव्यांबद्दल सर्वसामान्य जनता आणि मतदारांमध्ये संतापाची भावना आहे. रवी राणा यांची ही बेताल वक्तव्यच नवनीत राणा यांच्या पराभवाला कारणीभूत ठरणार आहेत, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे.