Home Politics यमराज खरात यांची लहुजी शक्ती सेनेच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती

यमराज खरात यांची लहुजी शक्ती सेनेच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती

यमराज खरात यांची लहुजी शक्ती सेनेच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती

पुणे: प्रतिनिधी

यमराजभाऊ उर्फ प्रकाश खरात यांची लहुजी शक्ती सेनेच्या शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विष्णुभाऊ कसबे यांनी त्यांना नियुक्तीपत्र प्रदान केले.

लहुजी शक्ती सेना ही मातंग समाजासह समाजातील सर्व वंचित घटकांसाठी काम करणारी संघटना आहे. या लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील महायुतीमध्ये या संघटनेचा सहभाग आहे. महायुतीचे अधिकारी उमेदवार निवडून आणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पदावर बसवण्याचा निर्धार संघटनेने व्यक्त केला आहे.

स्वातंत्र्योत्तर काळापासून आतापर्यंत दीर्घकाळ सत्तेवर असूनही काँग्रेस पक्षाने आमच्या मागण्यांकडे कधीही लक्ष दिले नाही. मात्र, मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आल्यावर आमच्या काही मागण्या मान्य झाल्या आहेत तर काही मान्य होण्याच्या मार्गावर आहेत, असे खरात यांनी सांगितले.

अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे वर्गीकरण व्हावे आणि त्यात समाविष्ट जातींना लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण मिळावे, अशी आमची प्रमुख मागणी आहे. मोदी सरकारने त्यासाठी स्वतंत्र अभ्यास गट नियुक्त केला असून त्यांच्या शिफारसीनुसार लवकरच आमची मागणी मान्य होईल, असा विश्वास कसबे यांनी व्यक्त केला. समाजातील सर्व वंचित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी संघटना सतत कार्यरत राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.