
पारस इलेक्ट्रिकल अँड एंटरप्राईजेस आणि रायझिंग स्टार स्पोर्टस असोसिएशन रावेत यांच्या संयुक्त विद्यमानाने “पारस चषक 2025” चे यशस्वी आयोजन
चिंचवड – रावेत मधील सर्व पिढ्यामध्ये खेळाची रुची वाढावी तसेच मोबाईल कडून मैदानाकडे जावे या हेतूने माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पारस इलेक्ट्रिकल अँड एंटरप्राईजस आणि रायझिंग स्टार स्पोर्टस असोसिएशन रावेत यांच्या संयुक्त विद्यमानाने “पारस चषक 2025” चे यशस्वी आयोजन करण्यात आले.
पहिल्या सत्रामध्ये फुल पीच क्रिकेट सामने दिनांक 8 आणि 9 फेब्रुवारीला डी मार्ट ग्राउंड रावेत या ठिकाणी घेण्यात आले.
सदर शृंखलेमध्ये 50 ते 60 खेळाडूंना खेळण्याची संधी मिळाली. खेळाडूंनी मोठ्या उत्साहात स्पर्धेत सहभाग घेतला. यामध्ये पाच संघ सहभागी झाले होते.
पारस एलईडी संघास तृतीय विजेतेपद, पारस सोलार संघास द्वितीय विजेतेपद आणि पारस ट्रान्सफॉर्मर संघाने “पारस चषक 2025” जिंकला.
वैयक्तिक पातळीवर ‘मॅन ऑफ द सिरीज’ हा किताब ओमकार मोहिते यांनी मिळाला. ‘बेस्ट फलंदाज, हा किताब अमर वायकर यांना मिळाला. बेस्ट फिल्डर हा किताब तुषार फाळके यांना मिळाला. बेस्ट गोलंदाज हा किताब मनोज सूर्यवंशी यांना मिळाला.
विजेत्या सर्व संघाचे व खेळाडूंचे मोरेश्वरभाऊ भोंडवे आणि पारस इलेक्ट्रिक यांच्याकडून सन्मानपूर्वक अभिनंदन करण्यात आले.
सदर स्पर्धा यशस्वी होण्यासाठी पारस इलेक्ट्रिक आणि इंटरप्राईजेचे मालक तुषार फाळके आणि रायझिंग स्टार स्पोर्ट असोसिएशन रावेतचे सेक्रेटरी माननीय अमेय टुमकर तसेच खजिनदार ओमकार मोहिते तसेच सुयोग चव्हाण, अमित गुरव पाटील,उपाध्यक्ष माननीय नरेश गाडगे आणि अध्यक्ष माननीय मदन दळे या सर्वांनी खूप मेहनत घेतली आणि स्पर्धा सुरळीत पार पाडली. यासाठी सर्व खेळाडूंकडून कडून या सर्वांचे खूप कौतुक करण्यात आले.