Home India मी अनुभवलेला राहुल! -डाॕ.मनिषा गरुड 

मी अनुभवलेला राहुल! -डाॕ.मनिषा गरुड 

0
मी अनुभवलेला राहुल! -डाॕ.मनिषा गरुड <br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

गेले 70 ,72 दिवस देशात एक प्रचंड उत्साह सळसळलेला दिसून येतोय. आपण सगळे त्याचे साक्षी आहोत ,
भले प्रसार माध्यम किंवा वृत्तपत्र खूप प्रमाणात भारत जोडो यात्रेची दखल घेत नाही आहेत, पण सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात यात्रा व्हायरल होत आहे
करोडो लोकांचा पाठिंबा, लोकांचे निर्व्याज प्रेम , कधी राहुलला आलिंगन देणं ,कधी त्याच्या गळ्यात पडून रडणं,
कधी माय ने त्याचे लाड करणे लहानग्यांनी त्याची पप्पी घेणे स्त्रियांना त्याच्याबरोबर अश्वस्थ आणि बिनधास्त वाटणं ,कुणाची तमा न बाळगता त्याला मिठी मारणं हे सारेच विलक्षण आहे .
रा गा महाराष्ट्रात आल्यापासून तो आपल्याला भेटेल का यासाठी सगळ्यांची उत्सुकता आणि चढाओढ लागली होती दिवसन दिवस लोकांना आवरण कठीण होत चाललं होतं. त्याच्या भोवती असणारे सुरक्षा कवच देखील वाढायला लागले होते .


अशात आमचं भारत जोडोला शेगावच्या सभेसाठी जायचे ठरले
प्रवास बराच मोठा होता त्यात सकाळी उठून चार वाजता एन्ट्री पॉईंट ला हजर राहणे अपेक्षित होते आम्ही वेळेवर पोहोचलो सव्वासहा पर्यंत यात्रा चालू झाली राहुल गांधींचा स्पीड मॅच करणे म्हणजे खरंच दिव्य होतं
तीन तासानंतर दोन वेळा गर्दीत धडपडून पाय मुरगळून
शेवटी पाच किलोमीटर अनवाणी चालत तो अविस्मरणीय क्षण आलाच
राहुल ला इतक्या जवळ पाहतोय यावर विश्वासच बसला नाही
त्या क्षणी तो एक युगपुरुष, बुद्ध पुरुष वाटला चकाकणारी गुलाबी त्वचा, त्यात अनुभवाच्या रेखा, स्मित पण उत्साही चेहरा आणि कमालीची मायेची ऊब. प्रेम आणि फक्त प्रेम वाहत होतं …. काय बोलावं ते सुचेना
कसं बस आपले इंट्रोडक्शन दिलं
Rahul ji I’m Dr Manisha Garud
You are looking like an Enlightened Man
डॉक्टर म्हटल्यावर त्याने अदबीने हात मिळवला नंतर मात्र बरोबर घेऊन चालू लागला
यात्रा यशस्वी होणार हे नक्कीच पण त्यातून जो राहुल गांधी सलाखून निघणार आहे तो नक्कीच एखाद्या बुद्ध पुरुषापेक्षा कमी नसणार …

-डाॕ.मनिषा गरुड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here