पिंपरी, ता. २० : शिवसेना युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची रविवारी (ता. २१) पिंपरी चिंचवड शहरात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दुपारी साडेबाराला जाहीर सभा होणार आहे, आदित्य ठाकरे यांच्या सभेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे संजोग वाघेरे यांनीआवाहन केले आहे.
आदित्य ठाकरे यांचे भक्ती शक्ती चौकात स्वागत करण्यात येईल. त्यानंतर हजारो कार्यकर्त्यांबरोबर ते दुचाकी रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत. या रॅलीचे स्वागत निगडी, आकुर्डी, चिंचवड स्टेशन आणि मोरवाडी चौकात होईल. यानंतर दुपारी साडेबाराला त्यांची सभा होईल. यावेळी ठाकरे यांच्याबरोबर पुणे जिल्हा संपर्क प्रमुख तथा आमदार सचिन अहिर, युवा सेनेचे सचिव वरुण सरदेसाई उपस्थित असतील.