Home Pimpri-Chinchwad महेश गायकवाड यांच्याकडून वजीर सुळका सर

महेश गायकवाड यांच्याकडून वजीर सुळका सर

0
महेश गायकवाड यांच्याकडून वजीर सुळका सर

महेश गायकवाड पेशाने सॉफ्टवेअर इंजिनीयर खूप दिवसापासून चे स्वप्न पूर्ण झाल्यासारखे वाटत आहे. २8० फूट उंच असलेला वजीर सुळका प्रस्तरारोहणासाठी अतिकठीण श्रेणीत गणला जातो. त्याच्या पायथ्याशी पोहचण्यासाठी कात्बाव (चाफ्याचा पाडा) गावातून तीन तासाची अतिशय दमछाक करणारी पायपीट करावी लागते. दुर्गम परिसर, उंच टेकड्या, घनदाट जंगल, निसरडी वाट दोन्ही बाजून खोल दरी, पाठीवर ओझे, यातून जराजारी पाऊल घसरले तर त्या व्यक्तीला दरीच्या जबड्यात विश्रांती मिळते अशी चर्चा केली जाते. पाण्याची प्रचंड कमतरता आणि त्यानंतर वजीर सुळक्याची २8० फुटाची ९० अंशातील सरळ उभी अतिकठीण चढाई करावी लागते. शारीरिक आणि मानसिकतेचा कस पाहणारी मोहीम म्हणून या वजीर मोहिमेकडे पहिले जाते. 

महाराष्ट्राच्या गिर्यारोहणातील वजीरचा असलेला हा वजीर सुळका सर करण्याचे ध्येय उराशी बाळगून जिद्द चिकाटी आणि साहस याच्या जोरावर सह्याद्री अडवेंचर च्या धडाकेबाज गिर्यारोहकांनी  दिनांक 27 फेबुवारी२०२2 रोजी शिलेदार संस्थेचे संस्थापक शिलेदार SRA यांच्या मार्गदर्शनाखाली वजीर सुळका सर करून गिर्यारोहण क्षेत्रात एक यशस्वी पाऊल पुढे टाकले आहे.

अलीकडेच दि.११ ते 13 फेब्रुवारी 2022 मध्ये फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब बरोबर DMK त्रिकूट म्हणजेच अलंग-मदन-कुलंग सर करून त्याचा रॅपलिंग व रॉक क्लाइंबिंग या ट्रेकचा अनुभव कामाशी आला.

फ्रेंड्स ट्रेकिंग क्लब तर्फे श्री महेश गायकवाड अभिनंदन करण्यात आले.