Home Politics ‘महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप का झाले नाही?’

‘महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप का झाले नाही?’

‘महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप का झाले नाही?’<br />
<b>Deprecated</b>:  strip_tags(): Passing null to parameter #1 ($string) of type string is deprecated in <b>/home/vishwasa/public_html/wp-content/themes/Newsmag/loop-single.php</b> on line <b>60</b><br />

प्रकाश आंबेडकर यांचा सवाल

पुणे: प्रतिनिधी

वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीत सहभागी होण्यासाठी उत्सुक असल्याचा पुनरुचार करतानाच, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे जागावाटप अद्याप का झाले नाही, याचे उत्तर आघाडीच्या नेत्यांनी जनतेला द्यावे, या शब्दात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीला ठणकावले आहे.

आपण महाविकास आघाडीला निश्चितपणे मदत करू. जो उमेदवार असेल त्याला निवडून आणू, असा मला विश्वास आहे. मात्र, जागा वाटपाबाबत काय काय ठरले, आघाडीतील कोणता पक्ष किती जागा लढविणार, आघाडीचे जागावाटप आत्तापर्यंत का झाले नाही, हे सगळे आघाडीच्या नेत्यांनी जनतेला स्पष्टपणे सांगावे, अशी मागणी आंबेडकर यांनी केली आहे.

भारतीय जनता पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधकांनी स्थापन केलेल्या इंडिया आघाडीच्या दिल्ली येथे होणाऱ्या बैठकीचे आमंत्रण आपल्याला मिळालेले नाही, असेही आंबेडकर यांनी स्पष्ट केले. इंडिया आघाडीच्या बैठकीची बातमी आपल्याला वृत्तपत्रातूनच कळली, असेही ते म्हणाले.

… उद्या पुण्यातूनही निवडणूक लढवू

अकोला लोकसभेची जागा वंचित बहुजन आघाडीने लढवावी, या शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विधानावर प्रतिक्रिया व्यक्त करताना आंबेडकर म्हणाले की, आमच्यासाठी केवळ अकोलाच महत्त्वाचे आहे असे नव्हे. मी अकोलाच काय, उद्या पुण्यातूनही निवडणूक लढवू शकतो. मी निवडणूक लढवणार किंवा नाही हे महत्त्वाचे नाही. ज्यांना ती लढवायची आहे त्यांनी लढवावी. आपण मदत करू, असेही ते म्हणाले.

देवेंद्र फडणवीस यांची ही साक्ष घ्या

कोरेगाव भीमा दंगलीच्या आधी त्या दिवशी काहीतरी घडणार असल्याची पूर्वसूचना पोलिसांनी दिली होती. त्या दिवशी नेमके काय काय घडले याची माहिती अद्याप आयोगासमोर आलेली नाही. ही माहिती मिळविणे अत्यंत महत्त्वाचे आहे, असे आपण आज पार पडलेल्या साक्षीत आयोगासमोर सांगितल्याचे आंबेडकर म्हणाले. यासंबंधी तत्कालीन मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात ही माहिती गेली होती का, गेली असल्यास कोणत्या वेळी गेली, हे समजणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही साक्ष घ्यावी, अशी मागणी आपण आयोगाकडे केल्याचेही आंबेडकर यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here