
नवी दिल्ली: प्रतिनिधी
एकीकडे अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याची जय्यत तयारी सुरू असताना जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील एका भिंतीवर बाबरी मशीद पुन्हा उभारण्याची मागणी करणारा मजकूर लिहिला गेला आहे. या मजकुराखाली एनएसयुआय असा उल्लेख करण्यात आला आहे. मात्र, या प्रकाराशी आपला कोणताही संबंध नसल्याचे विद्यार्थी संघटनेने स्पष्ट केले आहे.
जेएनयु आवारातील भाषा अभ्यास केंद्राच्या इमारतीतील भिंतीवर rebuild babri masjid असे लिहिले आहे. त्याच्याखाली नॅशनल स्टुडंट्स युनियन ऑफ इंडिया या काँग्रेसच्या विद्यार्थी आघाडीचे नाव लिहिण्यात आले आहे. मात्र, या मागणीशी आपला कोणताही संबंध नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे.
बाबरी मशीद पाडल्यानंतर तिची पुन्हा उभारणी करण्याबाबत यापूर्वी ही मागणी करण्यात आली होती. आता अयोध्येतील राम मंदिर खुले होत असताना पुन्हा एकदा वातावरण कलुषित करण्याच्या दृष्टीने हा प्रकार करण्यात आला आहे.