
अमित राजेंद्र गुरव अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून व लहानपणापासूनच एक अलौकिक बुद्धिमत्ता मिळालेला गुणवंत मुलगा आहे. परिस्थितीमुळे शालेय शिक्षण घेता न आल्यामुळे रिमांडोम व काही निवासी वस्तीग्रह,आश्रमांचा आधार घेत त्याने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण पूर्ण केले आहे. त्यानंतर त्याने छोटासा पॅकेजिंग चा बिजनेस चालू केला. रात्रीचा दिवस करून खूप मेहनत घेतली एकीकडे डान्सची आवड असताना व्यवसायात यशस्वी होण्यासाठी तन मन एक करून व्यवसायासाठी लागणारे सर्व कौशल्य शिकून घेतले. कोणतेही पाठबळ नसताना ऊन, वारा पाऊस याचा विचार न करता आयुष्यात आलेले चढ उतार सहन करून आपल्या पत्नीच्या मदतीने साई राम पॅकेजिंगची स्थापना केली आहे. त्याने संपूर्ण देशभर व भारताबाहेर आपला व्यवसाय पोहचवला आहे. या मेहनतीचाच एक भाग म्हणून आज ‘उद्योग रत्न 2023’ हा पुरस्कार अमित गुरव ला मिळाला आहे.