पिंपरी ः पिपळे गुरव येथील काँग्रेस कार्यालयात सकाळी 11 वाजता महात्मा गांधी व भारतरत्न लालबहादुर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त स्वं राजीव गांधी प्रतिष्ठान वतीने साजरी करण्यात आली. यावेळेस पिंपळे गुरव प्रभाग आरोग्य विभागातील महिलांकडून गांधी व लालबहादूर शास्त्री याच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी संदेश नवले म्हणाले, महात्मा गांधी आणि पंतप्रधान लालबहादूर शास्त्री हे देशाचे महान सुपूत्र होते. त्यांनी आपल्या कर्तृत्व आणि नेतृत्वाच्या बळावर भारताच्या उन्नतीचे प्रयत्न केले. त्यांच्याच विचारधारेवर देश ७५ वषॆ प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. यावेळी हिरामण देवकर यांनी आरोग्य बद्दल माहिती दिली.
यावेळी राहूल राऊत, गणेश सावत,अर्जून काबळे, शंकर जाधव, वैभव गायकवाड उपस्थित होते.